*कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे यांचा नवा पायंडा*
*निवड झालेल्या कलाकारांकडे जाऊन मंजुरी पत्राचे वाटप* …..
राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संतोष कानडे यांनी समाजापुढे एक नवा पायंडा घालून कलाकारांच्या कलेचा गौरव केला .
त्यांनी वेंगुर्ले तालुक्यातील निवड झालेल्या कलाकारांना स्वत: येऊन मंजुर पत्र प्रदान केली , त्यामुळे कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले .
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री शाहु महाराज कलाकार मानधन समिती गठीत केल्यावर तातडीने समितीची बैठक आयोजित करून जिल्ह्यातील १०० कलाकारांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली . त्यामुळेच गेली ८ ते १० वर्षे प्रतिक्षेत असलेल्या गोर गरीब कलाकारांना न्याय मिळाला . त्यामुळेच कलाकारांनी धन्यवाद दिले .
भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील गणपत सखाराम माधव , दिवाकर भिवा कुर्ले , राजन शामराव नवार , दत्तात्रय रामचंद्र शेणई , सुभाष राजाराम चेंदवनकर , इलीहास पेद्रु फर्नांडिस , विनायक न्हानु परब , जयराम श्रीपाद नाईक , लक्ष्मण अर्जुन नांदोसकर , सिताराम लवु मिसाळे इत्यादी कलाकारांना मंजुरी पत्र सुपूर्द करण्यात आली .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता. सरचिटणीस प्रशांत खानोलकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , शक्तिकेंद्र प्रमुख ताता मेस्त्री , बाबा राऊत , गजानन कुबल , दिपक परब , पांडुरंग मोंडकर , विजय तेरेखोलकर , सुहास नवार , प्रशांत नवार , रामचंद्र नर्से , चिन्मय माधव , अरविंद नवार इत्यादी उपस्थित होते .