*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धुक्याची चादर*
पहाटे पहाटे
धुक्याची चादर
दाटे दहीवर
हवेमधे।।
मिटलेल्या कळ्या
वेल पहुडली
आभा डोकावली
फांदीतून।।
दाटलेलं दव
पानापानावर
मोत्यांचे आगर
तेजःपुंज।।
धुसरले माळ
अदृष्य ती झाडी
निळीशार खाडी
धुक्यातील।।
हवासा गारवा
मनाला प्रसन्न
सुवर्ण किरण
धरेवरी।।
हरवले विश्व
धुक्याची चादर
सृष्टीचा पदर
चिंबलेला।।
पसरे शलाका
येता दिनमणी
सौंदर्याची खणी
उजळेल।।
अरुणा दुद्दलवार@✍️