You are currently viewing माती आणि माणूस

माती आणि माणूस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*माती आणि माणूस…*

“रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन”

माती आणि माणूस म्हटले की इंदिरा संतांची ही कविता
आठवायलाच हवी.मातीला व मनाला सौंदर्य बहाल करणाऱ्या
विविध ऋतूंचे फार सुंदर वर्णन त्यात आहे.खरं म्हणाल तर अहो, माती शिवाय आहे काय जीवनात? पंचमहाभूतांपासून
बनलेला हा देह, म्हणून इंदिरा संत म्हणतात, मातीतून मी आले वरती,मातीचे मम अधुरे जीवन. माती शिवाय जीवन फुलूच
शकत नाही. माती शिवाय जीवन? मातीमोलच समजाना? होय,जरा ही अतिशयोक्ती नाही, मातीच सारे काही आपल्याला देते.सगळे जीवन फुलते ते मातीतच! बीज टरारते
, वाढते, डोलते, फुलते, फळते मातीतच! माती म्हणजे जीवन
आहे जीवन! जीवंतपणा म्हणजे माती.

लहानपणी मला झाडे, फुले, भाज्या पिकवण्याचा फार छंद
होता, आता ही आहेच.नाशिक पासून २४ किलो मिटर वरती
७/८ वर्षांपूर्वी आम्ही ३ लोकांनी मिळून हौस म्हणून एक एकर
जमिन घेतली. डोंगरच, मुरूम जे सि बी ने सपाट करून मालकाने प्लॅाट विकले. डोक्याएवढे गवत होते त्यात. एक
दिवस काय सणक आली मला मी सरळ गाडी घेऊन जवळच्या उमराळे गावी गेले नि नुकताच एक नवाकोरा ट्रॅक्टर
मला तिथे उभा दिसला.मालकाला म्हटले चल, असे असे काम
आहे, जमिनीची लेव्हल करून दे. यायलाच तयार नाही? सरळ
खिशात पैसे टाकून दिले, नाईलाज होऊन माझ्या मागेमाग
आला व २/३ तासात दोन लेव्हलवर एवढी सुंदर जमिन दिसू
लागली की तिच्या प्रेमातच पडले मी! मग काय? दररोज ड्रायव्हर व मी सपाटाच लावला.(मी पण गाडी चालवते).

आधी पाणी शोधणारा नेला. वायरी व मशिनने त्याने पाण्याच्या दोन जागा दाखवल्या. मग गेले पेठ रोडला नि
बोअरवेल करणारी गाडी नेली शेतात. संध्याकाळ पर्यंत
खोद खोद करून ३२५ फुट खोल गेल्यावर पाण्याचा जो फवारा उडाला, वा रे वा! दीड इंच पाणी लागले, म्हटले
मला एवढे पुरे. मग पाईप पंप मोटार सारीच व्यवस्था केली.
मग गेले ड्रीपवाल्या कडे. पूर्ण शेतात पाईप लाईन व ड्रीप
एरिगेशन केले. ठिबकसिंचन योजना कार्यान्वित झाली. मग
तारा खांब आणून कंपाऊंड केले. नि मग मुक्त विद्यापिठात
जाऊन हापूस केसर नारळ चिंच लिंबू पेरू अशी नाना प्रकारची
४०० रोपे व खत टेंपो व मी असे मजुर घेऊन शेतात आलो व
संध्याकाळ पर्यंत सारी रोपे लावून त्यांना पाणी भरले.

वाह वा! काय निटनेटके व सुंदर दिसत होते शेत.. तिथे मी
नव जीवनाची,चैतन्याचाी पेरणी, लागवड केली होती. नाना
प्रकारची झाडे. विचारूच नका. त्या जमिनीत एक ही झाड
नव्हते सावलीलाही! (ड्रीप बरोबर १३००० लिटरची पाण्याची
टाकी ही बांधली, सांगायचे विसरले.)मंडळी हे काही एका दिवसात नाही झाले, सतत तीन महिने मी व ड्रायव्हर ह्या मोहिमेवर सकाळी ९ लाच बाहेर पडत होतो.पाईप आणायलाही स्वत: M I D C त गेले.टेंपोत पाईप , आम्ही
पुढे टोंपो मागे अशी दररोज नवनवीन कामे निघत होती. आम्ही
करवून घेत होतो.

एकदा तुमचे मातीशी नाते जुळले की माणूस गप्प बसूच शकत
नाही.मला तर बालपणापासून हा मातीशी खेळण्याचा छंद आहे.अगदी लहानपणी देखील मी मागच्यादारी फरशीवर माती
ओतून झेंडू लावत असे.हे सगळे करत असतांना सकाळी नऊ ते
रात्री आठ, सावलीला एकही झाड नाही, विचार करा, काळीकुट्ट झाले होते मी, पण हौसेला मोल नसते ना? मग मी
ठरवले , जे एकुलते एक छोट्टेसे झाड होते तिथे झापाळा करावा बसायला.तसे झोपाळ्याशी माझे फार जुने नाते आहे.
मग मी झोपाळा व पाण्या पावसात उपयोगी पडावी म्हणून एक
पत्र्याची शेड उभारायचे ठरवले. फॅब्रिकेटर बोलवला व शेड ,
झोपाळा करायचे ठरवले.पुन्हा टेंपो, सळया पत्रे ॲंगल सारी
खरेदी होऊन शेतातच काम सुरू झाले.वेल्डिंग मशिन आले नि
भराभर काम सुरू होऊन पुढे छोटासा ओटा, कमोडची व्यवस्था, पुढे पत्रे जरा वाढवून घेतले.घरात फरशा बसवल्या त्या मी दिंडोरीहून टेंपोने आणल्या.ओट्यावर
फरशा बसवल्या. बाहेर आत नळ कनेक्शन घेतले, वायरमन
बोलवून वीज घेतली नि माझी झोपडी आतबाहेर झगमगली!
अहा! काय आनंद झाला हो मला. आज शेतातल्या मातीत
सारी सुखे हात जोडून उभी आहेत.

सात वर्षे झाली मी लावलेली इवली रोपे आता आभाळाला भिडू पहात आहेत. काय नाही माझ्या शेतात? साग कदंबा पासून कांजू बदामा सह आंबे (४०० )आता मोहरू लागले आहेत.वयात आली ना झाडे आता. माझ्या झोपडीच्या दारात
बसून आता रस्ता दिसत नाही इतकी गच्च झालीत झाडे आता.
नाशिकच्या घरातले जास्तीचे अनवॅांटेड सामान मी दिवाणासह
झोपडीत नेले आहे.भांडी आहेत. चहा बनवू शकतो, मातीवर
तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाकही करू शकतो एव्हढी व्यवस्था आहे. प्लॅाट उंचावर व दोन लेव्हलवर आहे, मध्ये चढायला लोखंडी जीना आहे. तुम्ही गेट मधून प्रवेश करताच
पाम,फुललेला चाफा तुमच्या गालाला सलगी करत तुमचे स्वागत करतील, वड हात हलवून हॅलो म्हणत आंबे गालात
हसतील, साग लांबून फांद्या झुलवत दंडवत करतील.या या,
या मातीतील झोपडीत सारी सुखे हात जोडून उभी आहेत.
सी सॅा आहे, घसरगुंडी आहे, मोठ्ठा उंच जाईल असा छान लोखंडी झोपाळा आहे, बसा हसा डुला, झाडे म्हणतील आम्हाला बघा, फणस बोलवतील,केळी म्हणतील या,
चाखून पहा रानमेवा जरा! बोगनवेली गुलाबी पांढऱ्या देखण्या
फुलांनी , गुलाब जास्वंद मस्त हसत स्वागत करतील, म्हणतील, अहो, तुमच्या महालाहून थंडगार वारे इथे तुमचे
स्वागत करतील.झोपडीत सुखाने डोळे मिटत मी सारे सुख
अनुभवते जे मला पंचतारांकित महालातही मिळणार नाही.
आजु बाजू उंच उंच डोंगर मोकळे निळे आकाश, चोवीसतास
भरारणारी, उन्हातही थंडावा देणारी गार हवा मला करोडो रूपये देऊनही बाहेर मिळणार नाही जी इथे माझ्या झोपडीत
आहे.
ही माती मला हवे ते पिक देऊ शकते. टमाट्या पासून भाता पर्यंत कसलीही लागवड मी करू शकते. विहिरीला न आटणारे
गारेगार पाणी आहे.मी काही दिवस कांदे लसूणाचा प्रयोग केला. मस्त कांदे व लसूण मी काढला, खाल्ला. पण आता
ठरवले फक्त सुखाचा उपभोग घ्यायचा. कष्ट करण्याचे आपले
वय नाही.

मंडळी, महालात, गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्यालाही मातीच
जेवण देते. गच्चीवर बाग फुलवायलाही मातीच वर न्यावी लागते.त्यातच बाग व फुले फुलतात.माझ्या झोपडीच्या दारात प्रचंड फुललेला पारिजात व मोगरा तुमचे स्वागत करेल. झोपडीच्या खेटून असलेल्या लहान झोपाळ्यावर आडवे होताच
तुमची भावसमाधी लागेल व तुम्ही निसर्गात काही काळ हरवून जाल याची मला खात्री आहे.माती आणि माय ह्याच फक्त
माणसाला जोजवतात मग तो किती ही म्हातारा वा तान्हा असो
अशी मातीची महती आहे, होय ना? आणि खनिजे कोळसे हिरे
पाणी सारे सारे मातीच देते ना हो? मग खरे सांगा, माती शिवाय आपले जीवन अधुरेच आहे ना?खरे म्हणाल तर ..
मातीशिवाय आपले जीवन ? जरा कल्पना तर करून पहा ना?

माती नि माणसाचे नाते युगायुगाचे आहे पण आज आम्ही मातीला कॅांक्रिटने आच्छादतो आहोत. अहो, ही जमिन कसली
नाही तर काय सोने आणि पेट्रोल खाणार पिणार आहोत का आम्ही?ही माती पिकवली नाही तर आमचा सर्वनाश ठरलेलाच आहे मंडळी?
कधी उघडणार आमचे डोळे, देवा रे..! कधी शहाणपण येईल आम्हाला? भाकरीसाठी युद्धे होतील तेव्हा? माणसा रे..! वेळीच डोळे उघड बाबा! स्वत:च्या हाताने आपल्या आयुष्यावर
कुऱ्हाड नको मारून घेऊस बाबा?

ता.क.— यायचं ना माझ्या झोपडीत तुम्हाला.. या.
मी वाट पाहीन ..

धन्यवाद मंडळी…
जयहिंद … जय महाराष्ट्र..

आपलीच…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १८ डिसेंबर २०२३

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा