वैभववाडी येथे २० रोजी शासकीय भात खरेदी शुभारंभ…
वैभववाडी
वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शासकीय भात खरेदी करण्याचा शुभारंभ बुधवार दिनांक २० डीसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी तहसिलदार दिप्ती देसाई, संघाचे सर्व संचालक,सोसायटी चेअरमन, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहाणार आहेत.
यावर्षी आॕनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले जाणार आहे. प्रती किलो २१.८३ पैसे या दराने भात खरेदी करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी तालुका खरेदी विक्री संघाकडून प्रति किलो २०.४० पैसे दराने ६८१ टन भात खरेदी करण्यात येणार आहे. त्यातुन तालुक्यातील ४५१ शेतकऱ्यांना १ कोटी ३९ लाख रुपये मिळाले होते. या शिवाय शासनाकडून प्रती हेक्टर १५ हजार रुपये बोनस देण्यात आला. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.
चौकट-
आतापर्यंत तालुक्यातील ३३५ शेतकऱ्यांनी आॕनलाईन नोंदणी केली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यत नोंदणीची मुदत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन नोंदणी करावी. असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे यांनी केले आहे.