You are currently viewing *वीज ग्राहक संघटनेच्या सांगेली विभागीय बैठक कलंबिस्त येथे पार पडली

*वीज ग्राहक संघटनेच्या सांगेली विभागीय बैठक कलंबिस्त येथे पार पडली

*वीज ग्राहक संघटनेच्या सांगेली विभागीय बैठक कलंबिस्त येथे पार पडली*

*महावितरणच्या भोंगळ कारभारा विरोधात वीज ग्राहकांची नाराजी*

*माडखोल, सांगेली, सावरवाड, कलंबिस्त, शिरशींगे, वेर्ले आदी गावांतील वीज ग्राहकांची उपस्थिती*

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची सांगेली उपकेंद्र अंतर्गत वीज ग्राहकांची बैठक शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 3:30 वाजता तालुकाध्यक्ष संजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली कलंबिस्त ग्रामपंचायत येथे पार पडली. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी उपस्थित यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केलं. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना का स्थापन झाली आणि संघटनेची कार्य, ध्येय, ग्राहक हक्क आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा विज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी केले. यावेळी वीज ग्राहक जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बैठकीत सांगेली उपकेंद्रांतर्गत येणारे अन्य गाव, गावातील ग्रामपंचायत आणि इतर वीज ग्राहकांच्या समस्या वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. सर्व गावातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच त्याचप्रमाणे वीज ग्राहकांनी महावितरणच्या विरोधात असलेल्या अनेक समस्या वीज ग्राहक संघटनेकडे मांडल्या. यात प्रामुख्याने गेली जवळपास 50 वर्षे कधीही न बदललेले विजेचे पोल, खराब झालेल्या वीज वाहिन्या, जुनाट व कमी दाबाचे ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरच्या उघड्या असलेल्या डीपी आदींबाबत अनेकांनी तक्रारी मांडून लवकरात लवकर नवीन वीज पोल, वीज वाहिन्या घालण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्याच बरोबर कायमस्वरूपी वायरमन मिळणे, सावरवाड गांगो मंदिर, कलंबिस्त बीडयेवाडी, कोळंबवाडी, ओझरवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, पूर्ण प्राथमिक शाळा माडखोल क्र.१ या शाळेच्या पटांगणावरून मुख्य वीज वाहिनी जात असल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा धोका उद्भवू शकतो. याकरिता सदरच्या वीज वाहिनीचा मार्ग बदलण्यात यावा. त्याचबरोबर शिरशिंगे सांगेली माडखोल इत्यादी गावांमध्ये असणाऱ्या वीज समस्या दूर करणे आदी मागण्या करत 22 डिसेंबर 2023 रोजी सर्व गावांचे मिळून संयुक्त निवेदन कार्यकारी अभियंता, सावंतवाडी यांना देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी बैठकीसाठी तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, वीज ग्राहक संघटना कार्यकारिणी सदस्य समीर शिंदे (देवसु), सुनील सावंत (कलंबिस्त), अनिकेत माडगूत (उपसरपंच सावरवाड), कलंबिस्त येथील ग्राम. सदस्य सुरेश पास्ते, रमेश सावंत, रवींद्र तावडे, बाळकृष्ण सावंत, बाबा पास्ते, भास्कर सावंत, दीपक जाधव, सगुण पास्ते, वेर्ले येथील संदेश गोसावी, अशोक राऊळ, दिलीप राऊळ आदी वीज ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा