You are currently viewing महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज, सुकळवाड येथे संपन्न.

महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज, सुकळवाड येथे संपन्न.

महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज, सुकळवाड येथे संपन्न.

कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज यांच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांच्या नाविन्य पूर्ण संकल्पनांना मूर्तिमंत स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांचे मार्फत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत आज दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ११ वाजता मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज, सुकळवाड येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), सिंधुदुर्ग तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत नवले, हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये श्री. गणेश चिमणकर, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, श्रीमती मयुरी परब जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, श्री नितीन दवणे यंग प्रोफेशनल, व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय सादरीकरनाचे मुल्यमापन करण्यासाठी ज्युरी मेंबर म्हणून श्री. विजय जगताप, प्राचार्य यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी, श्री. प्रशांत माळी, सहयोगी प्राध्यापक, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी, श्रीमती भाग्यश्री वाळके ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर एम आय टी एम कॉलेज, श्री योगेश महाडिक, सहाय्यक प्राध्यापक, शासकीय तंत्रनिकेतन मालवण, श्री प्रसाद सावंत, पूर्णवेळ शिक्षक टीएमटी हायस्कूल महाविद्यालय सावंतवाडी, श्री सौरभ ठाकूर लेक्चरर, श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी डिगस, श्री प्रशांत केरवडेकर, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धेकरिता एकूण 192 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी ८० नवसंशोधक प्राथमिक फेरी साठी निवडले गेले,प्राथमिक फेरी मधून १७ नवसंशोधकांची निवड करण्यात आली होती त्यापैकी १६ नवसंशोधकानी आपल्या संकल्पनांचे सादरीकरण केले. या सादरीकरणचे जुरी मेंबर कडून मूल्यमापन करण्यात आले असून त्यापैकी उत्कृष्ट १० नव संकल्पानाची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी १ लक्ष रुपयाचे बीज भांडवल महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई याच्या मार्फत देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश चिमणकर, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती भाग्यश्री वाळके यांनी केले.

संवाद मीडिया*

*Once in a lifetime offer*
*डिसेंबर धमाका*

सर्वोत्तम संधी..सर्वोत्तम कार्स करिता..
*अशी संधी पुन्हा नाही*
किँमत वाढण्या पूर्वी खरेदी करा.

सर्व ऑफर केवळ २५ डिसेंबर पर्यंतच

५ स्टार ग्लोबल एन कॅप रेटिंग युक्त
टियागो आणि टिगोर सी. एन.जी. वर
*आर. टी. ओ.टॅक्स पुर्ण पणे मोफत*

अलट्रोझ पेट्रोल आणि डिझेल वर
*इन्शुरन्स फ्री*

अलट्रोझ सी. एन. जी. वर
*अक्सेसरिज पॅक फ्री*

एक्सिस्टिंग जनरेशन नेक्सोंन वर
*₹.८००००/- पर्यन्त चे फायदे*

या व्यतिरिक्त फायनान्स आणि जुनी कार एक्सचेंज केल्यास
*₹.३५००० पर्यन्त चा अतिरिक्त डिस्काउंट*

अन लिमिटेड किलोमीटर वॉरंटी देखील उपलब्ध

१००% ऑन रोड फायनान्स, एक्सचेंज, डेमो आणि टेस्ट ड्राईव्ह करिता आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

नोट:- दि.२० डिसेंबर पर्यंत
*मिड नाईट कार्निवल* अंतर्गत
खास आपल्या सोयी करिता सर्व ठिकाणचे शो रूम रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतील.

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119371/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा