सावंतवाडी :
आरोंदा श्री देवी सातेरी भद्रकालीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार १६ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्या निमित्ताने सकाळी देवीची पुजा व त्या नंतर धार्मिक विधी व त्या नंतर भाविकांचे नवस फेडणे व दर्शनास सूरवात होणार आहे. त्या नंतर रात्री १२ वाजता देवीची सवाद्य पालखी मिरवणुक व दारूसामानाची आतषबाजी होणार आहे. रात्री नाईक मोचे माडकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग सादर होणार आहेे. तरी जास्तीत जास्त भावीकांनी जत्रोत्सवा चा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.