मालवण :
मसुरे देऊळवाडा येथे श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त १६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. समाधीवर अभिषेक, १० वा. आरती भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वा. स्थानिक भजन, रात्री १० वा. ‘ कोर्टात खेचीन ‘ हे दोन अंकी विनोदी नाटक होणार आहे. उपस्थितीचे आवाहन देऊळवाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.