You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा

*वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा*

आडेली जि. प. मतदार संघातील भाजपा सरपंच व उपसरपंचांची आग्रही मागणी …….

*भाजपाच्या मागणीची तातडीने दखल घेत आठवड्यातुन दोन दिवस ( मंगळवार व गुरवार ) वेतोरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डाॅक्टर उपलब्ध रहाणार* …….

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे .परंतु वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने गेले कित्येक महीने सदर दवाखाना बंद स्थितीत आहे . त्यामुळे आडेली , मठ , पालकरवाडी , वेतोरे , खानोली , दाभोली , वायंगणी या ग्रामपंचायत हद्दीत रहाणार्‍या पशुपालक शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . तसेच दुसर्‍या ठीकाणी उपचारासाठी जावे लागत असल्याने गोर गरीब शेतकऱ्याला नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे . तसेच गुरांचे प्रतिबंधक लसीकरण होत नसल्याने गुरांना वेगवेगळे आजार होऊन , गुरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे .
सद्यस्थितीत वेतोरे येथील पशुवैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे कांबळेवीर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे . त्यामुळे आडेली जि.प. मतदार संघातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांना काही इजा झाल्यास वेळेवर जनावराना वैद्यकीय सेवा मिळत नाही . याची दखल घेत आडेली जि.प.मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी व सरपंच / उपसरपंच यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त , पशुसंवर्धन अधिकारी – वेंगुर्ले चे डाॅ.चव्हाण यांची भेट घेऊन तातडीने वेतोरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा , अशी आग्रही मागणी केली . या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक होण्यापूर्वी आठवड्यातुन दोन दिवस , म्हणजेच मंगळवार व गुरवार या दिवशी वेतोरे येथील दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर रहातील असे अभिवचन भाजपा सरपंच व पदाधिकाऱ्यांना दिले .
यावेळी पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील , खानोली सरपंच सुभाष खानोलकर , मठ उपसरपंच बंटी गावडे , वायंगणी उपसरपंच रवींद्र धोंड , वेतोरे शक्तिकेंद्र प्रमुख सुधीर गावडे , आडेली शक्तिकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर , पालकरवाडी बुथप्रमुख दिपक करंगुटकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , जिल्हा का. का.सदस्य मनवेल फर्नांडिस , निलेश मांजरेकर , आनंद मेस्त्री , सायमन आल्मेडा , दादा तांडेल इत्यादी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा