आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे सांगुळवाडी येथे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर –
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे दिनांक १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे १५० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. स्वयंसेवकांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंधारण, जनजागृती इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच स्वयंसेवकांच्या बौद्धिक विकासासाठी बौद्धिक चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आली आहेत. यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा, सायबर सुरक्षा, रक्तदान श्रेष्ठदान, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्त समाज, रक्तदान इत्यादी विषयावरती विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे, कार्यक्रम अधिकारी डॉ.माणिक चौगुले, डॉ .संतोष राडे-पाटील व प्रा.राहुल भोसले यांनी दिली.