सावंतवाडी
ग्रामपंचायत निवडणुकीची बिगुल अखेर वाजले असून, १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणुका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गावागावात निवडणुकीचा रणसंग्राम दिसून येणार असून, जिल्ह्यातील निवडणुका भाजप विरुद्ध शिवसेना असेच स्वरूप या निवडणुकीत दिसून येणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार यांच्यात जोरदार चढाओढ दिसून येणार आहे. या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठीची सोडत १६ डिसेंबर २०२० रोजी काढण्यात येणार आहे. तर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी व स्वीकारण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर पर्यंत मुदत असणार आहे. तर ३० डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, ४ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. तर ४ जानेवारी रोजीच दुपारी ३ नंतर निवडणूक चिन्ह देणे व उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर १५ जानेवारी मतदान होणार असून,१८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.