You are currently viewing अयोध्येतील राम मंदिरात राम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालयात बालसंस्कार रामकथा संपन्न.

अयोध्येतील राम मंदिरात राम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालयात बालसंस्कार रामकथा संपन्न.

अयोध्येतील राम मंदिरात राम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालयात बालसंस्कार रामकथा संपन्न.

ठाणे:

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये, रामजन्मभूमीवर बांधलेल्या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ह्याच पाश्र्वभूमीवर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने, ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालयात मंगळवार, दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी बालसंस्कार राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील पटांगणात सर्व विद्यार्थी बाळगोपाळांना ठणे भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या सदस्यांनी प्रभू श्रीरामाचे बाल, कुमार रुपातील जीवनचरित्र कथन करून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत संस्थेच्या मुख्याध्यापक मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरवात रामनामाच्या जयघोषात झाली मग मुलांकडून ओमकार करून घेण्यात आला, त्यानंतर भगवान श्री राम आणि त्यांचे गुरु ह्यांचे नाते आणि प्रभू श्रीराम ह्यांचे जीवन आदर्श ह्यावरील तीन-चार लघुकथा सांगितल्या गेल्या.यामध्ये श्रीराम चरित्रावरील गीतांचाही समावेश होता. ह्यामध्ये सामूहिक रामरक्षा पठणही केले गेले. याप्रसंगी मुलांना राममंदिराच्या इतिहासावरील व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या ठाणे शहर संयोजिका सौ.अश्विनीताई पटवर्धन, सहसंयोजिका सौ.अलकनंदाताई जोशी, इतर सदस्य सई देव,योगिता कात्रे, सोनाली मेहेंदळे,देविका वळंजू, शोभा परब, शशांक देव, विवेक बर्वे, आमोद पटवर्धन, विजय जोशी हे सर्व उपिस्थत होते.

रामाचे विद्यर्थी वयातील चरित्र मुलांना कळावे आणि आत्ता जे राम मंदिर अयोध्येत उभे राहिले आहे, त्यामागे किती वर्षांचा खडतर संघर्षआहे, किती लोकांनी ह्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे हे मुलांना कळावे तसेच हे मंदिर आता पुढे त्यांना जपायचे आहे ह्याची जाणीव मुलांना करून द्यावी ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते. असे आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या ठाणे शहर संयोजिका सौ.अश्विनीताई पटवर्धन ह्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ह्याप्रसंगी त्यांनी हा कार्यक्रम शाळेत घेण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल महाराष्ट्र विद्यालयाचे विश्वस्त श्री.केदारजी जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिताताई खैरे मॅडम तसेच शाळेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. हा वृत्तांत आध्यात्मिक समन्वय आघाडीचे ठाणे प्रसिद्धी प्रमुख रुपेश पवार यांनी दिला आहे.

आध्यात्मिक
समन्वय आघाडी
9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा