You are currently viewing शिक्षकांच्या जिल्हाबंदी संदर्भात शिक्षक भारती सिंधुदुर्गचे धरणे आंदोलन…

शिक्षकांच्या जिल्हाबंदी संदर्भात शिक्षक भारती सिंधुदुर्गचे धरणे आंदोलन…

सर्वत्र अनलॉक सुरू असताना फक्त सिंधुदुर्ग साठी असे नियम का..?.

ओरोस :

सात दिवसापूर्वी सिंधुदुर्ग शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा सिंधुदुर्गात अद्यापही शिक्षकांना जिल्हाबंदी कायम असल्याने तसेच शिक्षकांनी हायस्कूलच्या ठिकाणी वास्तव्यास राहावे असा काही तालुक्यात अट्टाहास आहे, असा निर्णय कायम असल्याने शिक्षकांना मानसिक त्रास होत आहे, सर्वत्र अनलॉक सुरू असताना फक्त सिंधुदुर्ग साठी असे नियम का…? असा प्रश्न शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संजय वेतोरेकर यांनी करत सिंधुदुर्ग शिक्षक भारतीच्या वतीने  धरणे आंदोलन केलं. यावेळी छात्रभारतीचे मुंबई विद्यापीठ संघटक श्री. श्रीधर पेडणेकर उपस्थित होते.आंदोलन स्थळी जि. प.सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष श्री.रणजित देसाई व शिक्षण व आरोग्य सभापती श्रीम. सावी लोके यांनी भेट देऊन समस्या समजावून घेतली व सकारात्मक आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा