*मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा* .
*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग*
*भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान*
ओरोस
भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई , किसान मोर्चा कोकण विभाग संघटक डॉ. गणेश बांदकर , माजी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अमृत चौगुले व कृषी आयडॉल दादा सामंत यांच्या उपस्थितीत वसंत स्मृती , ओरोस जिल्हा कार्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गेल्या नऊ वर्षांत केलेले काम ऐतिहासिक आहे .पिक विम्याच्या बाबतीत तर मोदी सरकारने कमालच केली , प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे देशातील कोट्यावधी शेतकर्यांना सहजपणे विम्याचे कवच मिळाले . राज्यातील भाजपा महायुती सरकारतर्फे शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा ही योजना सुरु करण्यात आली. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी खुप मोठे विकासकार्य केल्यानंतर आता पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र ही योजना सुरु केली आहे . ” जय किसान ” ही घोषणा मोदी सरकारने खऱ्या अर्थाने अमलात आणली आहे. भाजपा किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी मोदी सरकारची कामे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी असे आवाहन केले .
या बैठकीमध्ये खालील जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
*जिल्हा उपाध्यक्ष*
श्री. किशोर नारायण नरे , डॉ. बाबासाहेब दत्ताराम राणे , श्री. भुषण दिनकर बोडस , सौ. दिपाली सँम्युयल काळे , सौ. किर्तीमंगल दिपक भगत
*सरचिटणीस*
श्री. गुरुनाथ सदाशिव पाटील , श्री. अजय सावंत , श्री. महेश संसारे , सौ. ज्योती देसाई
*चिटणीस*
श्री. सूर्यकांत नाईक , श्री. विजय रेडकर , श्री. अनिल मनोहर पेडणेकर , श्री. मोहन जाधव
*शेतकरी उत्पादक कंपनी संपर्कप्रमुख*
श्री. जनार्दन उर्फ दादा सामंत , श्री. प्रसाद भोजने , श्री. यशवंत पंडित , श्री. शंकर तेजम .
*जिल्हा कार्यकारिणी सदस्य*
सौ. जैबा नावळेकर , श्री. संदिप देसाई , श्री. जयेंद्र कविटकर , श्री. ज्ञानेश्वर मयेकर , श्री. साई प्रसाद नाटेकर , श्री. चंद्रकांत गुरव , श्री. मंगेश भोगटे , श्री. प्रमोद सावंत , श्री उदय सावंत , श्रीमती रेखा खाडिये , श्री. आनंद गावडे , सौ. प्रियांका प्रभू , श्री अक्षय तेंडुलकर , श्री नारायण शृंगारे .
*ॲग्री क्रॉस कृषी पदवीधर*
श्री प्रकाश झेंडे
*मंडल अध्यक्ष*
यशवंत धर्णे – दोडामार्ग , श्री. राजन विष्णू राऊळ – आंबोली ,संतोष शेटकर – वेंगुर्ला , महादेव सावंत – ओरोस , वैभव शेणई – कुडाळ , महेश सारंग – मालवण , सुहास कामतेकर – पडेल , गणेश सागवेकर – देवगड , अवधूत नारकर – वैभववाडी , श्री दामोदर नारकर – फोंडा
नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी सदस्य पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष यांना श्री. उमेश सावंत व श्री. प्रसन्न देसाई यांनी भावी काळामध्ये जोरदार काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस महेश संसारे यांनी केले .