*गझल मंथन साहित्य संस्थेने ओणीच्या शाळेत भरली गझलकारांची कार्यशाळा*
*कार्यशाळेत ४० प्रशिक्षणार्थींनी गिरवले गझलेचे धडे*
राजापूर, (प्रतिनिधी)
ओणी ता. (राजापूर) येथे मराठी गझल लेखन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत ४० प्रशिक्षणार्थींनी गझलेचे धडे गिरवले. या कार्यशाळेच्या निमित्ताने गझल मंथन साहित्य संस्थेने मराठी गझलेला ग्रामीण भागापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे.
गझल मंथन साहित्य संस्था व रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतर्फे राजापूर तालुक्यातील ओणी येथील नूतन विद्यामंदिरात निःशुल्क गझल लेखन कार्यशाळा घेण्यात आली. ओणीचे प्राचार्य, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर आणि गझल मंथन संस्थेच्या रत्नागिरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यशाळेत गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी व गझलकार डॉ. राज रणधीर यांनी गझलविधेवर परिपूर्ण मार्गदर्शन केले. नवोदितांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेनंतर दोन बहारदार मुशायरे रंगले. त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मुशायराचे अध्यक्षपद डॉ. राज रणधीर आणि अजिज मुकरी यांनी भूषविले. कोकणातील ओणीसारख्या छोटया गावात अशा प्रकारची गझल कार्यशाळा ओयोजित करणे आणि ती इतक्या मोठया प्रमाणात यशस्वी करून दाखवणे, हॆ गझल मंथन साहित्य संस्था आणि रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगिरी आहे. गझल विश्वातील एक व्यापक पाऊल आहे. सुत्रसंचलन मकसूद सय्यद आणि अर्चना देवधर यांनी केले. कार्यशाळेचे यशस्वी संयोजन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कुळये आणि रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
______________________
शोभा वागळे
मुंबई कार्यकर्ती
(गझल मंथन संस्था)
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क :*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*