*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री आरती जठार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भावंडं*
बालपणी भांडायचे, खूप मारामारी करायचे.
आई-बाबांच्या ओरड्यापुढे, एकमेकांना सावरायचे.
शिक्षण घेता घेता,कुटुंबाचे संस्कार शिकायचे.
काहीही झाले तरी, कुटुंब आपलं सावरायचे.
कटकट कधी सासरी जाईल? म्हणून भाऊ चिडवायचा.
ती जाणार या विचाराने,उशीत डोकं लपवायचा.
सासरी सुखात ठेव तिला,देवाला विनवायचा.(बहीणीला)
तिच्या मागे त्याचाही संसार सुरु व्हायचा.
संसारातील अडचणी,दोघेही लपवायचे.
कसे सुखी आहोत आपण? म्हणून भासवायचे.
असं करता करता,चाळीशी केव्हाच उलटते.
राखी, भाऊबीज,माहेरपण,ओढ तशीच राहते.
सल्ला देती एकमेकां, तब्येत जपण्याची.
थोडीबहुत भिती दोघां, आयुष्याच्या संध्याकाळची.
पन्नाशीच्या आसपास,खाचा संसाराच्या सांगुनी
दोघेही करती मन मोकळे,दाखवती भावना अश्रूंतुनी.
बालपणीच्या आठवणी जागवती ओतप्रोत.
अशी ही भावंडं कधीही मोठे नाही होत.
सौ.आरती जठार, डोंबिवली.
संवाद मीडिया*
*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*
*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*
*आमची खास वैशिष्ट्ये*👇
*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*
*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*
*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*
*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*
*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*
*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*
*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*