You are currently viewing दिव्यांगांचा विभागीय मेळावा संपन्न

दिव्यांगांचा विभागीय मेळावा संपन्न

दिव्यांगांचा विभागीय मेळावा संपन्न

सिंधुदुर्ग

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग आणि ग्रामपंचायत नारिंग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांचा विभागीय मेळावा पार पडला.

३ डिसेंबर जागतिक अपंगदिनाचे औचित्त साधून दिनांक ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिना दिवशी संस्था आपल्या दारी या संकल्पनेतून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या वतीने हा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नारिंग्रे गावाचे सरपंच मा. महेशजी राणे, त्यांचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, आरती बापट, सुनील बापट, प्रकाश वाघ, शामसुंदर लोट, प्रकाश सावंत, दीक्षा तेली, सत्यवान पावले, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अपंग वित्त महामंडळाचे अधिकारी नितीन परब व साळवी साहेब उपस्थित होते. महामंडळाच्या वतीने त्यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले.

जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उपक्रम व योजना तसेच इतर विविध योजना, दिव्यांग उपयोगी साहित्य व उपकरणे या बद्दल उपस्थित दिव्यांग बांधवांना माहिती दिली व मार्गदर्शन केले. गरजू दिव्यांग बांधवांची नाव नोंदणी करून घेण्यात आली. तसेच चार अंध दिव्यांग बांधवांना ‘पांढरी काठी’ वाटप करण्यात आली. नारिंग्रे येथील आबासाहेब राणे विदयालय येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमास सत्तर हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. सुनील बापट यांनी उपस्थित मान्यवरांचे व दिव्यांग बांधवांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा