*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अंगातोंडाशी आलेलं माणूसपण!!*
जिवंत जिव्हाळ्याची झुळझुळ
माझ्याही काळजात येते
कंठातून फुटलेले रडू
माझ्याही ओठात साचते…!
अंगातोंडाशी आलेलं माणूसपण
मीही मिरवत जातो
ह्दयांत वेदनेची गाठ
कालपावेतो बाळगत होतो…!
नाराज होण्याचा जमाना
कधीच निघून गेला
दुर्लक्ष करण्याचा जमाना
दुर्दैवाने लाखमोलाचा झाला..!
नातंही वेळ पाहून
मागच्यामागे पळून जात!
मनास झळ सोसून
नात मिरवावं लागत!
संकोच नको जगण्याचा
पैलू उलगडत होतो
अवचित हाती आलेल्या
लौकिकाला ठोकरून जातो…!
अंगातोंडाशी आलेलं माणूसपण
मुक्याने मिरवत राहतो….!
झटकून टाकता येईल
तितकं झटकतं जातो…!!!!
बाबा ठाकूर धन्यवाद