*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विसावा*
थांब कविते थांब आता
घे जरा विसावा
वळणावरच्या
वाटेपर्यंतचा
प्रवास खूप झाला
थकली असेलच तू
इथवर प्रवास करून
घे जरा विसावा
इथून दिसते
रम्य ती सृष्टी वेगळी
आणिक नवे वळणावरचे
घेऊ नवे अनुभव
विचारपुष्पे
शब्दलेखणी सोबत
नवचैतन्याचे घेऊन बळ
पुन्हा मार्गस्थ होऊ
त्या स्तव
घे जरा विसावा
अजून खूप दूरवरचा
प्रवास बाकी आहे
अंतापर्यंत….
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.