सिंधुदुर्गनगरी
सन 2020 ते 2025 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुंबई ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2-अ(1)(2) नुसार पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले असून तालुक्यांसाठीचा सरपंच पदासाठी आरक्षणाचा कोटा तनिश्चित करण्यात आला आहे. सदर सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सदर सोडत कार्यक्रम राबवताना सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुनर्वसन यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्य विषयक सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता याबाबी विचारात घेऊन कार्यवाही करावी असे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हे कळवितात.