You are currently viewing बांदा येथे मराठा समाजाच्या वतीने १० रोजी जाहीर सभा

बांदा येथे मराठा समाजाच्या वतीने १० रोजी जाहीर सभा

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सावंतवाडी :

 

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला बळ देण्यासाठी तसेच मराठा समाज संघटना मजबूत करण्यासाठी बांदा येथे मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक १० रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सभा येथील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न होणार आहे. या सभेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत, सावंतवाडी तालुका मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे उपस्थित राहून समाज बांधवाना मार्गदर्शन करणार आहेत.

या जाहीर सभेला बांदा शहर व परिसरातील मराठा समाज बांधव व भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा