राज्य खोखो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग संघाची निवड
मालवण
पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी १४ वर्षांखालील दोन्ही गटांच्या जिल्हा संघांची सिंधुदुर्ग खोखो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तावडे व दुर्वांक मेस्त्री यांनी निवड केली आहे.
निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे :- १४ वर्षांखालील मुलीच्या गटात किमया चव्हाण (चौके हायस्कूल), वैष्णवी पुजारी (मुटाट हायस्कूल). आर्या पोफळे (वराडकर हायस्कूल कट्टा), गायत्री घाडी (मुटाट हायस्कूल), रुची ठाकुर (पणदूर हायस्कूल), अंबिका चव्हाण (वराडकर हायस्कूल कट्टा), तनिष्का सावंत पणदूर हायस्कूल), हर्षिता गावडे (वराडकर हायस्कूल कट्टा), ईशा शिरोडकर (वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा), सानवी बागवे (वराडकर हायस्कूल कट्टा), ऐश्वर्या आळवे (वराड हायस्कूल), कृतिका लोहार (वराडकर हायस्कूल), अनुष्का शिंदे (चौके हायस्कूल), ईशा सावंत (डिगस हायस्कूल), पलक चव्हाण (चौके हायस्कूल).
मुलांचा संघ पुढीलप्रमाणे :- अर्णव वरके (ओरोस हायस्कूल), अथर्व शिंदे (चौके हायस्कूल), तेजस सकपाळ (चौके हायस्कूल), मयुर पुजारी (चौके हायस्कूल), चिराग माईणकर (कुडाळ हायस्कूल), सुरज जाधव (ओरोस हायस्कूल), प्रशांत भगत (रेकोबा हायस्कूल), सोहम चव्हाण (डिगस हायस्कूल), रौनक गावडे (कुडाळ हायस्कूल), महेश कामते (चौके हायस्कूल), आदित्य राठोड (ओरोस हायस्कूल), ओम मयेकर (रेकोबा हायस्कूल), कुशल गावडे (चौके हायस्कूल), पराग कदम (वराड हायस्कूल) यांची निवड करण्यात आली.
या संघाचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दोन दिवस झाले. खेळाडूंना श्रीनाथ फणसेकर, अनिल आचरेकर, दुर्वांक मेस्त्री, कल्पेश मेस्त्री, बंडू सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वराडकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संजय पेंडुरकर, किसन हडलगेकर, मूषण गावडे, कमलाकर हाडये, धनंजय शिंदे, बाबा कुबल यांनी परिश्रम घेतले. संघाला वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अॅड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.