ओरोस : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रधान कार्यालय ओरोस येथे जिल्हा बँक अध्यक्ष मा.श्री मनिष दळवी, उपाध्यक्ष मा.श्री अतुल काळसेकर यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्यकार्य अधिकारी श्री. प्रमोद गावडे, बँक सर व्यवस्थापक श्री.दिपक पडेलकर,श्री.पी डी सामंत श्री.नितीन सावंत,श्री. के.बी.वरक,बँक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँकतर्फे प्रतिमेस अभिवादन
- Post published:डिसेंबर 8, 2023
- Post category:ओरोस / बातम्या / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
