*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
मानवात असणारा
गणल्या जातो मानव,
परी असा एक आहे
म्हणती महामानव..।१।
नवी वाट दाखविली
ज्याने मानव जातीला,
चकाकी आणली बघा
ह्या भारतीय मातीला..।२।
ज्यांना ज्यांना त्यांनी दूध
हे वाघिणीचे पाजले,
मुके बोलावया अन्
गुरगुराया लागले..।३।
जन्मभर दीनांसाठी
असे केले महत्कार्य,
शांतीच्या मार्गावरचा
तो ठरला क्रांती सुर्य..।४।
लहान मोठे सगळे
म्हणती त्यांना साहेब,
ते आहेत भारतरत्न
आमचे बाबासाहेब..।५।
भिमा तुझ्यामुळे
आम्हाला भेटले,
एक असे वरदान
ग्रहण आमचे सुटले..।६।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*