सावंतवाडी संस्थान मराठा समाज स्नेहसंमेलन २० जानेवारीला
कुडाळ
सावंतवाडी संस्थान मराठा समाज (मुंबई) या संस्थेचे २९ वे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा येत्या २० जानेवारी रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी कोकण कृषी विद्यापीठा (दापोली) चे कुलगुरू डॉ. संजय भावे हे प्रमुख अतिथी म्हणून, तर प्रमुख वक्ते म्हणून टाटा मोटर्स लिमिटेड (पिंपरी-पुणे) चे सुशील वारंग उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यात दहावी, बारावी, उच्च शिक्षित, शिष्यवृत्तीत उच्च श्रेणी प्राप्त मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. दहावीत ८० टक्के, बारावीत ७५ टक्के, शिष्यवृत्तीत उच्च श्रेणी प्राप्त तसेच इंजिनिअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चरसह अन्य शाखांमध्ये उच्च श्रेणी प्राप्त झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत मराठा समाज सभागृह येथे द्यावी. अधिक माहितीसाठी संस्थेचे कुडाळ कार्यालय तसेच सावंतवाडी सालईवाडा येथील टी. बी. देसाई वसतिगृह (संपर्क-कोठावळे ८३०८०६०८८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक समितीप्रमुख आर. एल. परब यांनी केले आहे.