You are currently viewing देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार – नारायण राणे

देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार – नारायण राणे

देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार – नारायण राणे

भाजपच्या विजयाचा मालवणात जल्लोष…

मालवण

तीनही राज्यातील भाजपच्या विजयाचा जल्लोष येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही दिसून येईल. विजय भाजपचाच होईल. आगामी प्रत्येक निवडणुकीत हेच चित्र देशात सर्वत्र दिसून येईल. देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार असा ठाम विश्वास केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज येथे व्यक्त केला.
भाजपला मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा जोरदार जल्लोष मालवण शहर भाजप कार्यालय येथे आज सायंकाळी करण्यात आला. या विजयोत्सवात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. ढोल ताशा गजर फटाक्यांची आकर्षक आतिषबाजीही करण्यात आली.
यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अशोक सावंत, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, बाबा परब, दीपक पाटकर, विकी तोरसकर, गणेश कुशे, राजू राऊळ, बंड्या सावंत, राजन गावकर, आबा हडकर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, पूजा करलकर, चारुशीला आचरेकर, पूजा वेरलकर, पूजा सरकारे, महिमा मयेकर, विलास मुणगेकर, बबन परुळेकर, महेश बागवे, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, बबलू सावंत, अवी सामंत, प्रमोद करलकर, नीलम पांजरी यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात ५४ योजना सर्वासामान्य जनतेला दिल्या. ८० टक्के जनतेला मोफत धान्य दिले. पुढेही पाच वर्षे हे सर्व सुरुच राहील. जनता भाजप सोबत आहे हे निवडणूक निकालातून दिसून आले आहे. विरोधकांचा दारून पराभव होतच राहणार. त्यांनी चिंतन करत राहावे. महाराष्ट्रात मातोश्रीचे पाचच्यावर आमदार निवडून येणार नाहीत अशी टीकाही श्री. राणे यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा