पहाटेचं स्वप्न
पहाटेची गुलाबी थंडी
त्या गुलाबी थंडीत
तुझी चाहूल,
तुझं माझ्याजवळ येणं
विलक्षण नजरेने
माझ्याकडे पाहणं,
माझ्या हातात
तुझा हात देणं,
गवताच्या पातीवरील
दवबिंदूंचे तुषार
पायांच्या नाजुक
स्पर्शाने तुडवनं,
त्या थंडगार स्पर्शाने
अंगावर शहारे येणं,
तुझ डोकं अलगद तू
माझ्या खांद्यावर टेकवणं,
तुला बाहुत घेऊन
पहाटेची सैर करणं,
आपल्याच विश्वात
मनसोक्त डूबणं….
तेवढ्यात अंगावर
सकाळची सोनेरी
किरणे पडून खाडकन्
स्वप्नांतून जागे होणं,
सर्व काही विलक्षण…
या गुलाबी थंडीत….!
दीपी…!
८४४६७४३१९६