*वीज ग्राहक मिळावे आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची पार पडली बैठक*
सावंतवाडी (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेणे आणि महावितरण कंपनी व ग्राहक यांच्यातील दुवा बनून त्यांचे निवारण करणे या उद्देशाने व्यापारी संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका संघटना कार्यरत झाल्या आहेत. सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका संघटनेतर्फे वीज ग्राहक मेळाव्याच्या नियोजनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी सावंतवाडी नगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृह क्रमांक 7 मध्ये वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारणीची बैठक पार पडली.
या बैठकीत तालुक्यात घेण्यात येणाऱ्या वीज ग्राहक मेळाव्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे गावागावांतील वीज ग्राहकांकडून महावितरण कडून वीज वितरण संबंधी असलेल्या तक्रारी लेखी स्वरूपात एकत्र गोळा करून वीज ग्राहक मेळाव्यात मांडून अधिकाऱ्यांकडून त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी ग्राहकांनी तक्रारीची एक प्रत महावितरण, दुसरी संघटनेकडे व एक स्वतःकडे पोच घेऊन ठेवावी असेही सांगण्यात आले. घरगुती ग्राहकांना अचानक येणारी हजारो रुपयांची बिले हा प्रश्न गंभीर असून त्यावरही अधिकाऱ्यांकडून योग्य उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीसाठी अध्यक्ष संजय लाड(माडखोल) सदस्य समीर दीपक शिंदे,(देवसू) रामचंद्र महादेव राऊळ,(तळवडा ) शैलेश वासुदेव कुडतरकर,(सावरवाड), सूर्यकांत यशवंत राऊळ(माडखोल),( पुंडलिक दळवी,(सावंतवाडी) राजेंद्र ग. सावंत (सावंतवाडी) सुनील धोंडी सावंत(कलंबिस्त), कृष्णा जयराम गवस(कोनशी), समीर शिवराम माधव(सरमळे), संतोष हनुमंत तावडे(ओटवणे ), मोतीलाल विनायक कामत,(दांडेली) अस्लम खतीब (बांदा), संजय नाईक सचिव,(साटेली) गणेश तथा बाळ बोर्डेकर, जि.समन्वयक,(सावंतवाडी) आनंद नेवगी, ता.उपाध्यक्ष(सावंतवाडी) दीपक पटेकर, जि.उपाध्यक्ष(सावंतवाडी) आदी उपस्थित होते.