कुडाळ :
कुडाळ गावचे दैवत व श्रध्दास्थान श्री देव कुडाळेश्वर देवतेचा वार्षिक जत्रोत्सव 2 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त संपूर्ण दिवस देवाला नारळ ,केळी ठेवणे, नवस करणे, नवस फेडणे आदी विधी सुरू राहतील. रात्री 11 वाजता ढोल ताशांच्या गजरात श्रीं ची पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर रात्री 12 वाजता वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.3 डिसेंबर रोजी पहाटे दहीकाला होऊन या जत्रेची सांगता होईल. तरी भाविकांनी या जत्रोत्सवाला उपस्थित रहावे ,असे आवाहन सर्व राऊळ पुजारी व श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ (कुडाळ ) यांनी केले आहे.