You are currently viewing मेक इन इंडिया सिंह शिल्पाचे अनावरण

मेक इन इंडिया सिंह शिल्पाचे अनावरण

*मेक इन इंडिया सिंह शिल्पाचे अनावरण*

पिंपरी

सायन्स पार्क चौक, ऑटोक्लस्टरसमोर, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक ०१ डिसेंबर २०२३ रोजी मिलेनियम सेमीकंडक्टर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनिर्मित मेक इन इंडिया सिंह शिल्पाचे अनावरण पिंपरी – चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिका कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर, साहाय्यक शहर अभियंता प्रमोद ओंभासे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मिलेनियम सेमीकंडक्टर्सचे व्यवस्थापकीय संचालक हरेश अबिचंदानी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवी पगार, वरिष्ठ व्यवस्थापक सुनील देशमुख, विपणन विभागाचे उपाध्यक्ष हेमंत बढे, तंत्रज्ञान विभाग उपाध्यक्ष विवेक चोरडिया, व्यवस्थापक मारुती गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विजय खोराटे म्हणाले की, “पिंपरी – चिंचवड या औद्योगिकनगरीला स्मार्टसिटीचा दर्जा मिळाला आहे. हा नावलौकिक कायम राखण्यासाठी शासन, प्रशासन, औद्योगिक आस्थापनाबरोबरच सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. मिलेनियम सेमीकंडक्टर्सकडून उभारण्यात आलेल्या या शिल्पामुळे शहराच्या सौंदर्यात मोलाची भर घातली गेली आहे. या गोष्टीची पुनरावृत्ती शहरातील अन्य ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा आहे!” हरेश अबिचंदानी यांनी आपल्या मनोगतातून, “मेक इन इंडिया या राष्ट्रीय अभियानांतर्गत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फायबरमधील सिंह शिल्पाचे निर्माण करताना वैविध्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टसिटीसाठी योगदान देण्याची उत्तम संधी महानगरपालिकेने आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही शतशः धन्यवाद देतो!” अशी भावना व्यक्त केली.
अंजली पाटील, महादेव चिंचोळे, विद्या खाती आणि मिलेनियम सेमीकंडक्टर्सच्या कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. राहुल तुपटकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा