You are currently viewing ग्लोबल टीचर पुरस्कारीत रणजीतसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह..

ग्लोबल टीचर पुरस्कारीत रणजीतसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह..

ग्लोबल टीचर पुरस्कारीत रणजीतसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे. आजच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही त्यांनी मंगळवारी भेट घेतली होती. तर त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही ते भेटले होते. आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना करोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

 

मुंबईहून बार्शीला परतल्यानंतर डिसलेसरांना थकवा व इतर त्रास जाणवू लागला. त्यांच्या पत्नीला त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांची करोना संबंधित चाचणी घेण्यात आली असता डिसले दाम्पत्य करोनाबाधित आढळून आले. इतर कुटुंबीयांची चाचणी नकारात्मक आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःहू करोना चाचणी करून घ्यावी. यात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये, असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा