एस आर दळवी फाउंडेशनच्या वतीने २ डिसेंबर रोजी वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम…
ओटवणे
पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनने
आपल्या उपक्रमांतर्गत शनिवारी २ डिसेंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले आहे. वायंगणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीमेला दुपारी २ वाजता प्रारंभ होणार आहे.
विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र दळवी आणि सिता दळवी या दांम्पत्याने बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस आर दळवी फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशनने अग्रक्रमाने शिक्षक सक्षमीकरणासह पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये जल, ध्वनी, वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे. या प्रदूषणातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एस आर दळवी फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकले आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीसह जनजागृतीसाठी एस आर दळवी फाउंडेशनने वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले आहे. या स्वच्छता मोहीमेचे नियोजन एस आर दळवी फाउंडेशनचे शिक्षक प्रशांत चिपकर आणि फाऊंडेशनची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा टीम करीत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या स्वच्छता मोहिमेत वायंगणी परिसरातील महिलांसह ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस आर दळवी फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन कृष्णा मदने यांनी केले आहे.
या स्वच्छता मोहिमेत फाउंडेशनचे एस आर दळवी फाउंडेशनचे संस्थापक रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, सौ सीता दळवी, राज्याध्यक्ष महेश सावंत, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कन्काळ, वायंगणी सरपंचदत्ताराम दुतोंडकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री. बागुल आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*