अचानक आलेल्या पावसाने उडाली धांदल
सावंतवाडी
परतीचा पाऊस जावून तब्बल दीड महिना उलटला असतानाही आज दुपारी सावंतवाडी तालुक्यात प्रचंड गटगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहराच्या काही भागासह मळगाव व परिसरात पावसाची रीप रीप पहायला मिळाली. अचानक दाखल झालेल्या पावसामुळे साऱ्यांचीच धांदल उडाली. विशेष म्हणजे प्रचंड गडगडाट व वीजांचा लखलखाट यामूळे हा पाऊस नक्की मध्येच कसा परतला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.