*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*आत्महत्या—६*
आत्महत्या सर्व प्रकारातील व सर्व थरातील पुरुष (स्त्री वा नर ) करत आले , पण चर्चा बलात्कारीत महिला वा शेतकरी वा विद्यार्थी यांच्या आत्महत्येविषयी केव्हाही जास्त झाली .
प्रश्न सहजच पडतो की जबाबदार कोण ?? आपण तूर्तास स्त्रीया करत असणार्या आत्महत्येविषयी विचार करु . महाभारतात एक श्लोक आहे , ” स्त्रीसंबंधी होणार्या दुष्कृत्यास सर्वस्वी केवळ पुरुषच जबाबदार आहे ” . अशा अर्थाचा . याला काही अर्थ आहे ?? महाभारत हे ” व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ” असे ज्यांचेविषयी सांगितले जाते त्यांनी लिहीले आहे ! एकांगी , एकतर्फी वैचारिक साहित्य संमेलनात भिकेत मिळणार्या पुरस्कार प्राप्त माणसाने नव्हे !!! स्त्री ही कधीही अबलाच ! आणि सबलाची वाईट नजर सहज अबलांवर जाते हा प्रघात आहे . म्हणून ते वाक्य आहे .
मग लोकशाहीत हा नर असा वागतो कसा ? याला बिघडवणारी साधने कोणती ? १) नालायक बलशालींना पाठीशी घालणारे नेते , २) वर्तमान पत्रातील मनावर आघात करणारी वर्णने ( आणि नोट असते — प्रसिद्ध साहित्यास संपादक जबाबदार नाही !!! मग छापतात कशाला !! समाज बिघडवायला ? टीआरपी वाढवायला ? ) ३) टीव्हीवरील मालिका — एक मालिका उत्कृष्ट भारतीय संस्कृतीचे निख्खळ शुद्ध दर्शन दाखवत असेल तर शपथ !!!???? ४) चित्रपट — सद्गुणी संस्कार करणारे चित्रपट नाहीतच ?? वर म्हणायचं आम्ही सर्व दाखवू ! तुम्ही ठरवा काय उचलायचं !! आणि समाज मानसशास्त्राचा अभ्यास तर कट्रोल बोर्डाचाही नाहीच !! बिनडोकांचा बाजार !! अहिराणी भाषेत एक म्हण आहे — यडी नी मती नी घुबड ना चाळा । अशी सुंदर वाटचाल सुरु आहे आपल्या लोकशाहीची !! आणि पुढारी वा नेते फक्त शिकार शोधण्यात व्यस्त !! वरुन म्हणी आहेतच १) बळी तो कान पिळी २) ज्याचे हाती ससा तो पारधी ??? ५) मानस उत्तेजित करणार्या निरनिराळ्या जाहिराती आणि खास करुन स्त्रीपुरुष संबंध विषयक . त्या ही कुठे ? खास म्हणजे सरकारी वाहने म्हणजे बसेस !!!! सरकारी स्वच्छतागृहे !!! वाह !!! महामूर्खांनी निवडलेल्या हरामखोरांच्या लोकशाहीतील दुसरी हीन दृश्ये कुठली असतील ?? ” इतने दिन मे फायदा , नही तो पैसा वापिस !! ” सगळ्या हिंदीतून वा मराठीतून !! बाबा सगळे बंगाली एकतर भोंदु वैदु !!! पाकिस्तानात हिंदु मुली कोण पळवतं ? तोच समाज अशा प्रकारच्या जाहिराती करण्यात जास्त !! आणि आमच्या महाराष्ट्रीयन स्त्रीला डोहाळे लागतात , माझा मुलगा ना अमुक खान नटासारखा जन्मायला हवा !!! त्या जिजामातेनंतर एकही जिजामाता नाही महाराष्ट्रात ? काय चालू आहे शिवरायांचे प्रदेशात ?? महाराज आले तर काय पहातील ?? माझा भालचंद्र , चंद्रशेखर , शरत्चन्द्र , रामचंद्र , चंद्रभान , चंद्रकान्त , मणीचंद्रम् हे कुणासमोर मान झुकवताहेत ?? या जाहिरातवाल्या बाबांसमोर ! अत्याचार का कमी होतील अशाने ?? अरे हो यांचेही नावात चंद्रच आहे नाही का ? मग ते सूर्याला का करतील नमस्कार ? चंद्रालाच करतील !! विसरलोच की ??
पण कळलं का अत्याचार वाढविणारी कार्यकारण मीमांसा ? आम्हाला लक्झरी स्वच्छ हवी ? कारण पैसे देतो !! मग एसटीला काय चिंचोक्या देतात ?? का मागणी करत नाहीत वाईट जाहिरातींशिवाय स्वच्छ एसटी , वर्तमानपत्र वा टीव्हीदर्शन हवे म्हणून !!!!!! नालायक आपण ही ठरतो लोकशाहीत , तक्रार करत नाही म्हणून !! लोकशाहीत तक्रारीलाच महत्व , निवडलेली व्यक्तिमत्वे काही कामाची नाही ???? सुधरा आपणच आणि टाळा आत्महत्या !! कारण लोकशाहीत अत्याचारच होतो व मग दाद मागावी लागते !? तर मिळते वा नाही हा वेगळाच प्रश्न अजून ?? पण जिथे अत्याचार तिथे आत्महत्या ठरलेली !!! तुम्ही ठरवा सरकार कुणाचे हवे ?? असो . आत्महत्या टळावी . कुणीही तिच्या आहारी जावू नये ही इच्छा .
इत्यलम् । बाकी पुढील अंकी ।
🙏🙏 🙏🙏
©लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*संवाद मिडिया*
*गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..🏍️🏍️*
*Advt Link👇*
————————————————-
🏍️ *गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..* 🏍️
👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸
👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷
👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷
👉 *DESTINI PRIME – फक्त रु. 999/- डाऊनपेमेंटमध्ये..*💥
👉 अधिक एक्सचेंज बेनिफिट
👉 फ्लिपकार्ट बुकिंगवर ही कॅश डिस्काउंट 💷
👉 5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास…😇
👉 आजच खरेदी करा📝🏍️
👉 *नियम अटी लागू*
🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*
*📱9289922336 / 7666212339*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*