You are currently viewing सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची मांदियाळी

सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची मांदियाळी

सोनुर्ली माऊलीच्या चरणी भक्तांची मांदियाळी

ओटी भरणे व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी

सावंतवाडी

दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रौत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपुर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. सोनुर्ली ‘बाये ‘च्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही भाविक सोनुर्ली क्षेत्री दाखल झाले होते. सकाळ पासूनच हजारो भाविक देवीचा जयघोष करत माऊली चरणी नतमस्तक होत होते.

तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रौत्सवाला मंगळवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. उत्सवमुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर सात वाजल्यापासून देवीचे दर्शन भक्तासाठी खुले करण्यात आले. मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीचे दर्शन देण्यात आले. यावेळी ओटी भरणे व केळी ठेवण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. मंदिरापासून काही अंतरावर दुचाकी व चारचाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आले असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे सोपे झाले होते.

भक्तांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही पोलिस प्रशासनाबरोबरच देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केलेले असल्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. सकाळपासूनच भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या.

तर दुपारपासून ती अधिकच वाढत गेली. भक्तांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी देवस्थान कमिटीकडून मंडप व्यवस्था करण्यात आली होती. माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे केळी ठेवण्याचा कार्यक्रम सुरु होता. स्वयंसेवक नेमून दिलेल्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने योग्य ती खबरदारी घेत होते.
जत्रौत्सवानिमित्त माऊलीच्या प्रांगणात हॉटेल, दुकाने व इतर स्टॉलही मोठया प्रमाणात उभारलेले होते. दोन दिवस याबाबत व्यावसायिकांची लगबग दिसून आली होती. केळी, फुले यांचे स्टॉलही मोठया प्रमाणात लागले होते. कोकणातील सुप्रसिद्ध मालवणी खाज्याची दुकानेही सजली होती. विशेष म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच परप्रांतीय व्यापाऱ्यांची भरणा जत्रोत्सवात दिसून आला. थंडीचे दिवस असूनही आईसक्रीम ज्वेलरी दुकानांची संख्याही मोठया प्रमाणात होती. खेळण्यांची दुकाने व गृहोपयोगी वस्तुंचीही दुकाने थाटली होती.

सोनुली श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे, रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे मंदिर उजळून निघाले होते. तर गावात प्रत्येकाच्या घरी विद्युत रोषणाई असल्याने एकप्रकारे नवचैतन्य आले होते.

*संवाद मीडिया*

🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

*सोनुर्ली येथील श्री देवी माऊली लोटांगण जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत!!! 💐💐*

*💐!! स्वागतोत्सुक !!💐*

*माऊली फरसाण*

*होलसेल व किरकोळ विक्रेते*

*श्री. प्रेमानंद गाड*
*कु. काव्या प्रेमानंद गाड*

*पत्ता- 689 देऊळवाडी, सोनुर्ली, ता. सावंतवाडी, जि सिंधुदुर्ग*

*संपर्क 📲 9403532083 / 9579492266*

*Advt link*
https://sanwadmedia.com/117736/
———————————————–

🌹श्री. पांडुरंग राधाकृष्ण नाटेकर उर्फ बाप्पा नाटेकर🌹*

*अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग*

*Advt link*
https://sanwadmedia.com/117740/
———————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा