You are currently viewing एमआयडीसी मध्ये भीषण आग….

एमआयडीसी मध्ये भीषण आग….

 

डोंबिवली पूर्व भागातील सोनारपाडा परिसरात एमआयडीसी फेज 2 ला लागून असलेल्या एका गोदामामध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक भंगाराचे गोदाम आहे. दुपारी अचानक या गोदामाला आग लागली.

 

आग लागल्यानंतर काही वेळांनी स्फोटाचा आवाज आला. स्फोटाच्या आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि एकच धावपळ उडाली. आगीचे लोट शहरात दूरपर्यंत पाहण्यास मिळत आहे.

 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, ही आग कशामुळे लागली, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा