You are currently viewing विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील    वंचित घटकाने लाभ घ्यावा  – जिल्हाधिकारी किशोर तावडे   

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील    वंचित घटकाने लाभ घ्यावा  – जिल्हाधिकारी किशोर तावडे  

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील    वंचित घटकाने लाभ घ्यावा  – जिल्हाधिकारी किशोर तावडे

  सिंधुदुर्गनगरी

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून  योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वंचित घटकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी  या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करते प्रसंगी  केले.

  विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमातंर्गत तळागळातील जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत ओरोस येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे, किशोर काळे, आरोस ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती आशा मुरमुरे, उपसरपंच श्री घाडीगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते. संकल्प यात्रेच्या चित्ररथात मोठया स्क्रीनवर लोकांशी निगडीत योजनांची माहिती दाखविली जाणार आहे. ज्यांना ज्या योजनांचा लाभ घेणे आहे, त्यांनी त्या संदर्भात चित्ररथासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारून योजनांचा लाभ कसा उचलता येईल ती माहिती जाणुन घ्यावी, असे श्री तावडे यावेळी म्हणाले. यावेळी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

*संकल्प यात्रेची उद्दिष्ट्ये *

राज्यभरात विकसित भारत संकल्प यात्रा या संकल्प यात्रेचे आयोजन दिनांक 15 नोव्हेंबर 2023 तेदि. 26 जानेवारी 2024 याकालावधीत करण्यात आलेले असुन सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सदर मोहिम ही दिनांक 24 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित केलेली आहे. सदर मोहिमे अंतर्गत विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहचणे, योजनेच्या माहितीचा प्रसार व जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी/ लाभार्थ्यांशी संवाद साधणे व यात्रे दरम्यान निश्चित केलेल्या तपशीलाद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे व मोहिमेअंतर्गत झालेल्या कार्यवाहीची माहिती विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेच्या संकेतस्थळावर दररोज अद्यावत करणे ही या संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत.

संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा