अवैधरित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी कणकवली येथील एक ताब्यात
इन्सुली भरारी पथकाची कारवाई: दहा लाख २४ हजार चा मुद्देमाल जप्त..
सावंतवाडी
अवैधरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कणकवली येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 2 लाख 24 हजारच्या दारूसह आठ लाखाची गाडी जप्त करून एकूण दहा लाख 24 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान ही कारवाई काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास माळेवाड जंक्शन अरुंद मळगाव रोडवर राज्य उत्पादन शुल्क इन्सुलि पथकाकडून करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली तपासणी नाका पथकाला गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनवटीच्या दारूची मोटारीतून बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोंदा मळगाव रस्त्यावर मळेवाड जंक्शन येथे सापळा रचण्यात आला होता. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथून जाणाऱ्या बोलेरो मोटारीला (एमएच ०७ एजी १८९५) तपासणीसाठी थांबविण्यात आले.
वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील सीटवर गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे ४० खोके आढळले. पथकाने २ लाख २४ हजार ४० रुपये किमतीची दारू व ८ लाख रुपये किमतीची मोटार जप्त केली. बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी चालकाला ताब्यात घेत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजित शिंदे यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक टी. बी. पाटील करत आहेत.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क :*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*