*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*आत्महत्या — ३*
आज पुलवामा वर्षी . पुन्हा आत्महत्या विषयाचे न उलगडलेले प्रकरण उघडतो .
पूर्वी चातुर्वर्ण्य व्यवस्था व राजेशाही होती . ही शिवाजी महाराजांपर्यंत सुरु होती . जी ऋषिप्रणित होती . समाज कसा उन्नत होईल ? देश कसा समृद्ध होईल ? यासाठी जी प्रणाली व नियम असतात ती व्यवस्था व पद्धती . आज राजेशाही संपली व लोकशाही आली . वर्णव्यवस्था तशीच आहे . पण आज आमच्या नासमज राजकारणी नराधमांनी ती नाकारली तरी जग आहे तोपर्यंत अथवा माणूस असे पर्यंत ती राहीलच !!! वर्णव्यवस्थेचा उत्तम पर्याय अजून नाही !! जसा काळ्या रंगाला कुणी पिवळा म्हटले वा पंतप्रधानाला कुणी पंतप्रधानच नाही म्हटले तर कुणी ऐकेल का ? तीच परिस्थिती व्यवस्थेची आहे . व्यवस्था ही कर्माधारीत आणि भेद हे देश व धर्मबुडव्यांनी खेळलेली चाल !! ( आज आम्ही आमचे म्हणून जगू शकतो ते का ? याचा विचार कुणीच करत नाही ? आमची व्यवस्था संपली की आमचं मन हे परधर्मियांचे धनच होवून जाईल !! हे लक्षातच येत नाही कुणाच्या ? ) हा फरक जो पर्यंत लक्षात येत नाही , तो पर्यंत आम्ही जिवंत असून मेलेलोच !! असो .
इथे व्यवस्थेत क्षत्रिय आहेत . ते दोन प्रकारचे . १) प्रत्यक्ष रणभूमीवर लढणारे व २) लोकशाही आहे म्हणून निवडून आल्यावर पाच वर्ष कारभार पहाणारे ! म्हणजे सरकार .
आता सरकार कसं चालवावं ? लोक शिक्षण हे brain oriented असावं का bread oriented असावं ! लोकांमधे देश धर्म जागृती हवी का नको ? का लाचारीचे जीवन शिकवायचे ? अशा व इतर सर्व गोष्टी सरकारवर अवलंबून असतात . संस्कृत मधे एक श्लोक आहे ” राजा हाच येणार्या काळाला वा सद्य परिस्थितीला कारणीभूत असतो ! ” आज आमचे राष्ट्रगान न मानणारी पिढी आमच्या टॅक्सवर सरकार पोसते आहे आणि आम्ही दीन दुबळे आहोत ? काय भयानकता आहे देशाची ?? बव्हंशी काही टक्याने ( सर्व सरसकट नाही !😃 ) आमदार काय वा खासदार नावाची दोन पायाची जनावरं संसद नावाच्या गोठ्यात चरण्यासाठी पाठवली जातात , या पलिकडे देश , धर्म , देव ह्या संकल्पना आहेत ! कुणाला भान आहे ! मृतवत आहेत सगळे !!!
आमच्या इतिहासात शालिवाहन नावाच्या राजाने मातीचे सैन्य तयार करुन शत्रू नामोहरम करुन जिकलं होतं त्याला !! ( मातीच्या सैन्याचा अर्थ समजून घ्या ! पण शालिवाहन हे नाव किती जणांना माहित आहे ? ) एवढा जाज्वल्य इतिहास ज्या देशाचा आहे , जिथे राम , कृष्ण खेळले त्या मातीवर परक्यांनी अधिकार दाखवायचा ? आणि आजवर ज्या सत्तेने सत्तर वर्ष त्यांना पोटात घातले त्यांची आपण हाजी हाजी करायची ! ही लाचारी !
आमची ओजस्विता , तेजस्विता , स्वाभिमान , मर्दानगी , अस्मिता हे सर्व पशुत्वाने जगण्यासाठी !! ” पश्यति इति पशुः ” म्हणजे जेवढे डोळ्यांना दिसते तेवढेच मानतो , बाकी नाही — तो पशु ! आणि ” असुषु रमन्ते इति असुरः ” म्हणजे जो वाईट गोष्टींमधे रममाण होतो तो असुर ! ह्या व्याख्या तरी जे निवडून गेले त्यापैकी किती टक्के नेत्यांना माहीत आहेत ?? दैवी सद्गुणसंपत्ती व ती सांगणारी श्रीमद्भगवद्गीता किती नेत्यांना माहित आहे ? फक्त मद , मत्सर , मोह , लोभ या दुर्योधनी विचारांपलिकडे यांच्या नजरा तरी चांगल्या दिसतात का ? हा मेलेला समाज दर्शवत नाही तर काय दर्शवतो ! त्या आत्महत्या करायची गरज काय आगोदरच मेलेलं मन घेवून नेता व समाज जगत असेल तर ?? समाधी तरी घ्यावी म्हणावं !! नाव तरी होईल !!
अजून एक गोष्ट सांगतो . १) ज्या देशात कोर्ट भरपूर चालते ! इतके की केसेस दहा दहा वर्ष रेंगाळत असतात , चित्र असं की आत्ताच पोलिस व वकिलांमधे मारामारी झाली !! २) एल. आय . सी. सारख्या कंपन्यांची चलती असते ! ३) इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्जाची जरुरी असते व ते काढले जाते आणि शिक्षण फक्त पैसे कसे मिळवावे ? याचेच असते , ४) जिथले साहित्तिक विद्वान एका विशिष्ट विचार प्रणालीचे गुलाम असतात व योग्यायोग्य निर्णय घेण्यास असमर्थ असतात ( आणि ह्या गोष्टी झाल्यात या सत्तर वर्षात व मृतप्राय झाला समाज !! ), अशी व्यवस्था ज्या देशात असते त्या देशातील माणसे मेलेलीच असतात !!!!! मग ते आत्महत्या करोत का ना करोत ??
इत्यलम् । बाकी उद्या पाहू .
🙏🙏 🙏🙏
©लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
*संवाद मिडिया*
*गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..🏍️🏍️*
*Advt Link👇*
————————————————-
🏍️ *गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..* 🏍️
👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸
👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷
👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷
👉 *DESTINI PRIME – फक्त रु. 999/- डाऊनपेमेंटमध्ये..*💥
👉 अधिक एक्सचेंज बेनिफिट
👉 फ्लिपकार्ट बुकिंगवर ही कॅश डिस्काउंट 💷
👉 5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास…😇
👉 आजच खरेदी करा📝🏍️
👉 *नियम अटी लागू*
🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*
*📱9289922336 / 7666212339*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*