You are currently viewing कणकवली प्रथमच निवासी नायब तहसीलदारपदी महिला…

कणकवली प्रथमच निवासी नायब तहसीलदारपदी महिला…

सौ. सुजाता पाटील यांनी स्वीकारला पदभार

कणकवली

कणकवली तालुक्याच्या गेले काही महिने रिक्त असलेल्या निवासी नायब तहसीलदारपदी सुजाता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती पाटील यांनी मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला._

त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार रोजगार हमी योजना, तसेच सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार म्हणूनही यशस्वीरित्या पदभार सांभाळला होता. येथील तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून थेट पदभार स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला नायब तहसीलदार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा