कुडाळ
धामापूर चौके मार्गे मालवण रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. रस्त्याची तातडीने डागडुजी करावी यासाठी सेनेकडून वेळोवेळी आंदोलनही छेडण्यात आली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
दरम्यान, हा रस्ता होण्यासाठी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले. या रस्त्यावरून कुडाळ – मालवण येथील प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आज अखेर मुहूर्त मिळाला असून कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची पाहणी शिवसेनेचे युवा नेते रुपेश पावसकर, नगरसेवक गणेश भोगटे, राजू गवंडे, शिवसेना शाखा प्रमुख बाळा पावसकर आदी उपस्थित होते.