You are currently viewing मोगरा फुलला

मोगरा फुलला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम लेख*

 

*मोगरा फुलला*

 

 

शीळ घालतो खट्याळ वारा

गंधाळला आसमंत सारा

हलकेच रिमझिम पाऊस धारा

शृंगारात मोगऱ्याचा सुगंधच न्यारा

 

मध्यरात्रीचा प्रहर उलटला होता पहाटेच्या आगमना साठी सारा निसर्ग जागा होऊन तयारीला लागला.

मंद धुंद पहाट वारा

पावसात न्हाली अवघी धरा

मंद वाऱ्याने मोहरलेल्या मोगऱ्याच्या लतावेली आणि मोगऱ्याचा सुहास. या सुगंधाने तनमन डवरले. पक्ष्यांचे गुंजन, वाऱ्याची शीळ, कृष्ण मुरारीच्या बासरी सारखी मनात भुरळ घालत होती. त्याच्या सुरात माझ्या जीवनाच्या सुरांचे सा रे ग म छान जुळले. ही प्रीत मधूनच मनाच्या तारा छेडत होती. मन भावनांचा हा पिसारा मनाला स्पर्शून जात होता अगदी मोर पिसाऱ्यासारखा अगदी मोरपिसाऱ्यासारखा. पावसात न्हालेले ते मखमली गवत त्याच्या ओल्या स्पर्शाने अंगावर शहारा येत होता. सुगंधाने मनाला वेडल नीआकाशाकडे नजर गेली. जणू गाभाळलेले ढग हळूहळू पुढे सरकत होते. मध्येच एखादी चांदणी लुकलुकत होती. शुक्राची चांदणी हसून मेघांच्या कडा मधून डोकावत होती. पावसाची एक सर ओसरली रिमझिम ओझरता नाजूक पाऊस चालू होता.

पहाटेचा गार वारा शीळ घालत खट्याळपणे या फुलांवरून त्या फुलांवर लहरत होता. त्याचा गार स्पर्श अंगाला झोपत होता. प्रफुल्लित मन सुगंधाने बहरले होते. सारा आसमंत जणू फुलांच्या सुगंधाने गंधाळला होता.

विरळ विरळ दिसणाऱ्या मोगऱ्यांच्या कळ्या आता आपल्या नाजूक पंखुडीत लपलेला सुगंध अलगद बाहेर सोडत होत्या. त्या मोहक सुगंधाने जणू निसर्ग भारावला होता. वेलीवर अलगद उमळणारी फुले एकमेकांच्या सोबतीने दाटी दाटीने दिसू लागली. जणू आकाशातल्या पांढऱ्या शुभ मोहक चांदण्या हिरव्या वेलींवर उतरले आहेतस त्यांचे नाजूक साजरे रूप आणि मनमोहक सुगंध ही निसर्गाची फार मोठी देणगी आहे.

या मोगऱ्याच्या धुंद सुगंधात वेढावलेलं मन मोगऱ्याच्या फुलांच्या विश्वात हरवलं. मोगरा हे अतिशय सुहासिक ,नाजूक, मोहक फुल आहे. या वनस्पतीची पाने जवळजवळ देठ रहित असतात. याच्या वेली झुडुप स्वरूपात असतात. वनस्पतीचा उगम मूलतः भारतात झाला आहे. मोगरा इंडोनेशिया तसेच फिलिपाईन्स देशाचे राष्ट्रीय फूल आहे.

हा गंधाळलेला मोगरा स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतो, शृंगार परिपूर्ण करतो आणि दोन जीवांचे मिलन सुगंधित करतो. या मोगऱ्याच्या फुलांना भारतात फारच मागणी आहे याची फुले देवपूजेसाठी, सजावटीसाठी, अगरबत्ती ,अत्तर बनवण्यासाठी गजरे ,हार तुरे साबण , उटणे अशा अनेक सुगंधी गोष्टी बनवतात.

हिंदू धर्मात मोगरा या फुलाला अद्वितीय महत्त्व असून मोगरा हे फुल देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आवडते फूल आहे. या सुगंधित विश्वातून मन प्रभेचे सौंदर्य न्याहाळू लागले. डोंगर माथ्यावरील हे मोहक केसरी रंग दाही दिशातुनी आभाळभर पसरलेले पाहताना त्या तांबूस सोनेरी रंगछटा मनीच्या भावनांचे रंग कधी गडद होऊन त्यात मिसळून गेले. या रंगात मनभावनांचा अवघाची रंग एक होऊन गेला. तो निसर्ग आणि त्याचा अविष्कार पाहताना मनीच्या भावना या रंगीत दुनियेत रंगून गेल्या.

मात्र मोगरा शुभ्र धवल वस्त्र परिधान करून होता. आणि त्याच्या पवित्र्याचा गंध सर्वत्र दरवळत होता. त्याच्या पवित्र्याने सुगंधाने आणि सौंदर्याने सारा आसमंत सुखावला आहे.

 

सौ .स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

 

*संवाद मिडिया*

 

*गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..🏍️🏍️*

 

*Advt Link👇*

————————————————-

🏍️ *गती नवी…. हिरो घरी आणायलाच हवी..* 🏍️

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME – फक्त रु. 999/- डाऊनपेमेंटमध्ये..*💥

 

👉 अधिक एक्सचेंज बेनिफिट

 

👉 फ्लिपकार्ट बुकिंगवर ही कॅश डिस्काउंट 💷

 

👉 5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास…😇

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा