तारकर्ली समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविण्यात यश…
सायंकाळची घटना: उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
मालवण
तारकर्ली येथील समुद्रात स्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडणाऱ्या चंदगड येथील विनायक पुंडलिक लोहार या पर्यटकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे ही घटना बुधवारी सायंकाळी घडली दरम्यान, विनायक लोहार याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला ओरोस येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले
आज बुधवारी सायंकाळी त्याच किनाऱ्यावर चंदगड येथील १५ पर्यटकांचा एक ग्रुप समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. या पर्यटकांपैकी काही पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. मात्र त्यांनी एकमेकांचा आधार घेत किनारा गाठला. याच वेळी विनायक लोहार हे पाण्यांत बुडू लागले. त्यांना मोठ्या शर्थीने पाण्या बाहेर काढण्यात यश आले. विनायक यांच्या पोटात पाणी गेल्या मुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यांना तारकर्ली येथील दत्तराज चव्हाण यांनी सीपीआर आणि छाती पोटावर दाब देत त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. व त्यांचे सहकारी संकेत तारी वैभव सावंत, कौशल टिकंम, नागेश देऊलकर यांच्या सहकार्याने त्यांना शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. शासकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होते.
*संवाद मीडिया*
*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃♀️🏃♂️
*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*
*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*
*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*
*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*
*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*
*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*
*📲9422767484 / 8317256802*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*