You are currently viewing थोडी जुनी थोडी नवी

थोडी जुनी थोडी नवी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*थोडी जुनी थोडी नवी*

 

दिवाळी म्हटलं की दिव्यांचा लखलखाट, फराळाचा घमघमाट, ठेवणीतले नवीन कपडे, अत्तरं, उटणं, रांगोळ्या, पाहुणेरावळे, पहाटेचं अभ्यंगस्नान ,घराची साफसफाई, आवरावरी, मातीचे किल्ले आणि त्यावर मांडलेले सैनिक, पणत्या, किल्ल्यावर मोहरी टाकून बारीक बारीक उगवून आलेली हिरवाई आणि काय काय आठवत राहतं. किती सुंदर होती दिवाळी लहानपणी. आम्ही रहायचो तिथे सांगलीतल्या सराफ पेठेत आजच्या सारख्या चिनी दिव्यांचा लखलखाट फारसा नसायचा. पण पणत्या आणि चांदणीच्या आकारातले मोठे मोठे आकाशदिवे असायचेच. त्यावेळी आमचं घर तीन मजली होतं. समोरच्या बाजूला दोन्हीकडे दुकानं आणि त्यामधूनच आत घरात जायला रस्ता होता. सगळ्या मजल्यांवर पणत्या लावायला आम्ही मुली,चुलत बहीणी आघाडीवर असायचो. पणत्यांचं तेल खाली झिरपून डाग पडू नये म्हणून आक्का म्हणजे माझी आज्जी पणती खाली पुठ्ठे ठेवायला लावायची. तिची शिस्त हा एक वेगळा विस्ताराने सांगण्याचा विषय आहे.

पहाटे लवकर उठून आईची तेल उटण्यानं आम्हाला आंघोळ घालायची घाई नि आमची नवीन कपडे घालून आधी फटाके उडवायला खाली कोण जातंय यांची घाई.

सांगलीचं गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आमच्या घराजवळच होतं. आम्ही मुली मुलीच देवाला पटकन जाऊन यायचो.

त्यावेळी आत्या,आत्तेभावंडंही दिवाळीसाठी यायची.घर अगदी भरून जायचं. मुलांना काय खाणं,फटाके,खेळ…मज्जा असायची. पण आईला,काकूला दिवसभर कामाच्या रगाड्यात स्वतःला गाडून घ्यावं लागायचं. तेव्हा आम्हाला या गोष्टी कुठे कळायच्या. आमची आपली छोटी छोटी मदत आईच्या मागं पुढं घुटमळत चालू असायची. मला आठवतंय करंजी करायला चार पाच मोठमोठाले पाट स्वच्छ धुवून पुसून आम्ही ओळीनं मांडून ठेवायचो. एक जण लाट्या कपायचा,दुसरा लाटायचा,तिसऱ्या पाटावर सारण भरून करंजी बंद करायची आणि फिरणी फिरवायची…मग ती करंजी शहाण्यासारखी कढईत पडून स्वतःला तळून घ्यायची, असा जामानिमा असायचा. पदार्थ कुठलाही असो पहिला घाना तळून झाला की देवापुढे ठेवायचा,ही गोष्ट कुणालाच वेगळी सांगावी लागली नाही.

ही फक्त करंजीची कथा. बाकी पदार्थांचा उत्साह पण तितकाच जबरदस्त होता. घरातल्या प्रत्येक स्त्रीचा कशान् कशात हातखंडा होता. माझ्या मोठ्या काकू चिरोटे जबरदस्त करतात..अजूनही.त्यातही रंगांची, कलाकुसरीची कमाल तर थक्क करणारी. आक्काच्या हातचे अनारसे, मधल्या काकूंचा चिवडा,भडंग आणि आईच्या हातच्या खुसखुशीत चकल्या म्हणजे कहर होता. विशेष म्हणजे हे सगळे जिन्नस मोठे मोठे डबे भरून करून ठेवलेले असायचे. पाहुण्यांकडे डबे भरून फराळ जायचा. दुकानात येणारे जाणारे सुद्धा फराळ,चहा पाणी केल्याशिवाय जायचे नाहीतच.इतकं अगत्य आणि प्रेम त्यावेळी दिवळीच्या पोटात असायचं.

 

आता हे सगळं आठवलं आणि ही अर्ध्या एक किलोची करंजी करताना हसूच आलं. लहानपणी भातुकलीच्या खेळात एवढेसे गूळ शेंगदाणे घेऊन लाडू केलेले… अगदी तसेच वाटले. आता पहिल्यासारखी दिवाळीची मजा नाही म्हणून मन खट्टू झाले. विचार करतच बसले होते की लेक खेळून आली आणि आज काय बनवलय म्हणून उत्सुकतेने पाहू लागली. चकली कधी करणार, हे केलं का? ते केलं का? धडाधड प्रश्नांची सरबत्ती सुरू. केलेल्या पदार्थाचं तोंडभरून कौतुक,खाण्यात मग्न झालेली तिची मूर्ती, चेहऱ्यावरचा आनंद …हे सगळं बघून असं वाटलं की अरे दिवाळी तर तीच आहे,दिवाळीची मजाही तीच आहे…हरवलं आहे आपलं बालपण!

कुठं बरं शोधुया? सापडेल का पुन्हा?

हो आणि उत्तरही मिळालं. माझ्याच लेकीच्या डोळ्यात.आपलं बालपण तिथंच तर खेळतय अजून; काही नवीन गोष्टी घेऊन काही जुन्या गोष्टी घेऊन.बस् तुम्ही हात पुढे करायची वाट पहातय…मग दिवाळी तुमचीच असणार, थोडी थोडी नवीन आणि थोडी थोडी जुन्या सारखी…पण आजही नितांत सुंदर.

 

अंजली दीक्षित-पंडित

छत्रपती संभाजीनगर

९८३४६७९५९६

 

 

*संवाद मिडिया*

 

*”शिवतेज” रो बंगलो भव्य प्रकल्प..🏘️🏘️*

 

*Advt Link👇*

————————————————-

*🏮दिवाळीच्या मुहुर्तावर🏮 🛣️ सावंतवाडी शहरात_ 🏘️ *अजिंक्य कन्स्ट्रक्शन* 🏘️ यांच्या 💫 *”शिवतेज”* 💫 *रो बंगलोच्या भव्य प्रकल्पात* आजच आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करा..😇

 

🏘️🏘️ *शिवतेज* 🏘️🏘️

 

👉 *रेरा क्रमांक – P52900053094*

 

👉 शिल्पग्राम पासून फक्त 400 मीटर अंतरावर चऱ्हाठे ग्रामपंचायत हद्दीत..😇

 

👉 रो बंगलो चा भव्य प्रकल्प🏘️

 

👉 डांबरी रस्ते🛣️

 

👉 आकर्षक इलेव्हेशन

 

👉 निसर्गरम्य परिसर🏡

 

👉 प्रत्येक बंगल्याच्या मागे व पुढच्या बाजूला मोकळी जागा 🏕️

 

👉 आजच बुक करा.. 📝

 

*👉संपर्क करा..!!📱*

 

*बिल्डर्स श्री. संजय सावंत*

9422381608 / 7276300298 / 8411066704

 

🎴पत्ता : अजिंक्य, श्रमविहार कॉलनी, जेलमागे, सावंतवाडी

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा