You are currently viewing मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षीची नुकसान भरपाई या आठवड्यात मिळणार

मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षीची नुकसान भरपाई या आठवड्यात मिळणार

मनसे कुडाळ तालुका प्रमुख प्रसाद गावडे यांची माहिती

कुडाळ
मागील वर्षी सन 2019 च्या जुलै ते सप्टेंबर हंगामात अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होऊन बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता. तत्कालीन कालावधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालानी शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार मदत जाहीर करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुडाळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव काही कामचोर शासकीय कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत जिल्हा प्रशासनापर्यंत सादर न केल्याने बहुसंख्य शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेत दिवाळीपर्यंत मागील वर्षीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याने वरिष्ठ पातळीवरून सदरची नुकसान भरपाई रक्कम मंजुर करण्यात आली असून येत्या आठवड्यात ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा