You are currently viewing लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*लक्ष्मीपूजन*

लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणामधला एक महत्वाचा दिवस.
प्राचीन काळातील यक्षरात्री ,दीपमाला आणि दीपप्रतिपदुत्सव आणि आता आपण दिवाळी म्हणून साजरी करतो.
कार्तीक महिन्यातल्या कृष्णपक्षात अमावस्येला लक्ष्मीपूजन होते.सुशोभित रांगोळीने ,झेंडुच्या तजेलदार फुलांच्या माळांनी घराचे दार सजवले जाते.पाटावर तांदुळ ,फुलपाकळ्या पसरून ,एका तबकात धन अलंकार ,लक्ष्मीच्या मूर्तीचे हळद कुंकु लावून ,दीप उजळवून यथासांग पूजन केले जाते.लाह्या बत्तास्याचा प्रसाद दाखवला जातो.
पुराण कथेनुसार ,या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. जिथे स्वच्छता,सौंदर्य,समाधान आणि सकारात्मकता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो.
अनेक घरांमध्ये श्रीसूक्तपठण केले जाते.
या दिवशी रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती.कुबेर म्हणजे शीवाचा खजीनदार.धनसंपत्तीचा स्वामी.
दीपप्रज्वलन करुन ,यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रीत केले जाते आणि त्याचे पूजन होते.
हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता.
मात्र कालांतराने कुबेराची पत्नी इरिता हिची जागा
लक्ष्मीने घेतली व तिचे पूजन होऊ लागले.आणि कुबेराच्या ठिकाणी गजाननाची प्रतिष्ठापना झाली.
व्यापारी वर्गात ,हिशोबाचे नवीन वर्ष या दिवशी सुरु होते.
सर्व ताळेबंद करुन नव्या वह्या जमाखर्चासाठी वापरात येतात. म्हणून पहिल्या पानावर लाभ—शुभ असे लिहून
वहीपूजन केले जाते.दुकानाची सजावट करुन ,लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन होते.आता संगणकाचा जमाना आला.
दुकानात वह्यांची जागा संगणकाने घेतली म्हणून तेही पूजनीय…कालाय तस्मै नम:।।
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला फार महत्व आहे.
केरसुणी हे स्वच्छतेचं प्रतीक.बाजारातून नवी केरसुणी आणून तिला लक्ष्मीच्या रुपात पाहून पूजले जाते…
या ठिकाणी मला एक सांगावेसे वाटते की,भरताने रामाच्या पादुकांना सिंहासनी ठेवून पूजले.आपल्या
हिंदु संस्कृतीमधे उच्च नीच असे काही नसावे ही संकल्पना आहे.निसर्गाच्या निर्मीतीत सारं काही पूजनीयच आहे.अशा सणांच्या निमीत्ताने हेही रुजवण्याचा प्रयत्न असतो.
लक्ष्मी म्हणजे लाभ.शरीर आणि मनाच्या आरोग्याचा लाभ!!लक्ष्मी म्हणजे केवळ आभूषणे ,कमावलेले द्रव्य नव्हे.वर्षभरात केलेली स्वकर्मे ही लाभालाभ ठरवतात.
आत्मबल हे धन असते. आणि पापपुण्याच्या जमाखर्चाचा
ताळमेळ असतो..तो या दिवशी सादर करायचा असतो.
मनोभावे प्रार्थना करायची असते .सद्विवेकासाठी.
सद्बुद्धीसाठी.मी कमावलेले द्रव्य नैतीक असावे.चुकीच्या मार्गावर माझी पावले न पडोत.मी कमावलेल्या द्रव्याचा विनीयोग यथोचित व्हावा.हे फक्त माझे द्रव्य अशी सत्ताधिष्ठीत भावना माझ्या ठायी कधीही न रुजो.. तू दिलेस तेच तुझ्या चरणी अर्पण…
या निरहंकारी भावनेनेच आजचे लक्ष्मीपूजन करुया…..

सौ. राधिका भांडारकर

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा