You are currently viewing डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाकडून “श्री माऊली मंदिर, डेगवे येथे हायस्माक ची मागणी”

डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाकडून “श्री माऊली मंदिर, डेगवे येथे हायस्माक ची मागणी”

मा.आमदार दिपकभाई केसरकर यांच्या कडे निवेदन सादर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ‘डेगवे” गावच्या मध्यवर्ती गावचे ग्रामदैवत श्री. माऊली मंदिर आहे. या मंदिरात प्रतिवर्षी ग्रामस्थ गावरहाटीचे विविध वार्षीक धार्मिक कार्यक्रम करतात. श्री.ब्राह्मण भोजन, श्री.सत्यनारायणाची महापुजा देवीचे कौल, श्रावण महिन्यात, नवरात्रोत्सवात प्रतीदिन भजन, दसरा, दिवाळीचे कार्यक्रम, विविध सामाजिक नाट्यप्रयोग, नवरात्रोत्सव, ग्रामस्थांच्या सभा, होळी, जागृतीदिन, तसेच इतर छोटे, मोठे विविध प्रकारचे गावरहाटीचे धार्मिक कार्यक्रम केले जातात.


या गावात ५००-६०० घरे असून गावातील अंदाजे १७००-१८०० पर्यत गावची लोकवस्ती आहे.
मंदिराच्या परीसरात घाडवंस, म्हारीगंण, दिपमाळा, तुळशीवृंदावन, चव्हाटा, अशी छोटी, मोठी मंदिरे आहेत. शिवाय पुर्वंजाची मंदिरे आहेत.
मंदिराच्या बाजूला विहीर, तलाठी कार्यालय, प्राथमिक शाळा, बालवाडी, भक्तनिवास, ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी आहे. त्यामुळे या परीसरात नेहमीच ग्रामस्थांची वर्दळ असते. मंदिराच्या परीसराची जागा मोकळी आहे. शिवाय मंदिर भव्यदिव्य आहे. मुंबई बांदा दोडामार्ग रस्त्यावर असलेल्या या मंदिराला आमदार निधीतून एक-दोन हायस्माक मंजूर केल्यास रात्रीच्या वेळी सदर मंदिराचा परीसराचे भाविकांना आकर्षक वाटेल. शिवाय पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊन डेगवे गावाला नव्याने वैभव प्राप्त असे मला वाटते.


तरी सदर ठिकाणी आपल्या आमदार निधीतून सन्२०२०-२०२१या वित्तीय वर्षाकरीता नवीन “हायस्माक” कृपया मंजूर करावा. व त्याकरिता आपला विशेष बाब म्हणूनआमदार निधी कृपया द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा