You are currently viewing नरकचतुर्दशी

नरकचतुर्दशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*नरकचतुर्दशी*

 

दिवाळी म्हणजे प्रकाश, उर्जा, चैतन्य.वातावरणात आनंद आणि प्रसन्नता !! प्रत्येकाला बालपणीची आपली आपली दिवाळी आठवत असतेच.आणि ती तशीच चालू ठेवण्याचा ध्यासही असतो.

आज कार्तिक कृष्ण पक्षातील चौदावा दिवस.ज्यास आपण नरक चतुर्दशी म्हणतो. परंपरागत,पिढ्यानुपपिढ्या

हा दिवाळीचा तिसरा दिवस त्याच उत्साहात साजरा केला जातो.सूर्योदया पूर्वी ऊठणे,तेल,सुगंधी उटणे लावून अभ्यंग स्नान करणे,स्नान करताना अंगणातला फटाक्यांचा आवाज,पायाखाली फोडलेलं प्रतिकात्मक

आसुराच्या रुपातलं कारिटाचे फळ,अंधारातल्या तेजोमय पणत्या,कंदील .सुरेख रांगोळ्या,नंतर सामुहिकपणे परिवाराबरोबर केलेला खास दिवाळी फराळ,देवळात जाउन फराळ अर्पण करणे ,या सर्वांची गंमत न्यारीच…

नरकचतुर्दशीला नरकापासून मुक्तीचा उत्सव म्हणतात.

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा संहार केला म्हणूनही यांस नरकचतुर्दशी असे म्हणतात.याला रुप चौदस किंवा छोटी दिवाळी असेही म्हणतात.या नरक निवारण दिनामागे एक पौराणिक कथा आहे.

रंती देव नावाचा एक शांत ,सद्गुणी राजा होता.त्याच्या मृत्युची वेळ आली.यमदूत त्यास न्यायला आले तेव्हां

राजाला कळले की मृत्युनंतर तो स्वर्गात न जाता ,नरकात जाणार आहे.तेव्हां तो यमाला विचारतो,”असे का?मी कोणते पाप केले?”

तेव्हां यमदूत सांगतात ,”अज्ञानामुळे तुमच्या दारी आलेला एक ब्राह्मण उपाशी माघारी गेला…म्हणून हे राजा!तुझ्यासाठी मोक्षाची दारे बंद झाली.”

राजा विकल होतो.तो यमदूताकडे चूक सुधारण्यासाठी

अवधी मागतो.त्यानंतर राजा रंतीदेव हजार ब्राहमणांचे

यथोचित यजमानपद स्वीकारून दक्षिणा,भोजन देऊन संतुष्ट करतो.ब्राह्मणांच्या आशिर्वादाने राजाला मोक्षप्राप्ती होते.तोच हा दिवस नरकचतुर्दशीचा…

दुसरी कथाही मनोरंजक आहे.योगाभ्यास करताना हिरण्यगभ राजाला शरीराची स्थिती नीट न ठेवल्या मुळे

कुरुपता येते.त्यावेळी नारद मुनी त्याला ,”कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला ,सूर्योदयापूर्वी सुगंधी उटणे लावून,

अभ्यंग स्नान कर,श्रीकृष्ण रुपदेवतेची पूजा कर .आरती कर.तुला तुझे सौंदर्य प्राप्त होईल .”असा सल्ला देतात.

हिरण्यगभ त्याचे पालन करतो.आणि त्यास सौंदर्य प्राप्ती होते.म्हणून या दिवसाला रुप चतुर्दशी असेही म्हणतात..

या दिवशी माता अंजनाच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला म्हणून हनुमानाचीही पूजा दु:ख आणि संकटापासून मुक्ती मिळण्यासाठी करतात.

या सर्व कथांचा जाणीव पूर्वक विचार केला तर लक्षांत येते की या सणांमागे,साजरेपणामागे विचार असतो तो अमंगल ते सारे नष्ट करायचे.दुष्प्रवृत्तीवर सत्प्रवृतीने विजय मिळवायचा,आनंद प्रेम भक्ती शांती, क्षमा, दान ,

समता, बंधुता, मैत्री ,सहअनुभूतीचा अंगीकार करायचा.

जीवन जगताना शिस्त नियम पाळायचे.निसर्गास जे मान्य आहे तेच अवलंबायचे.धर्माचरण म्हणजे नुसत्या रिती ,उपचार नव्हेत तर आत्मशुद्धी म्हणजे धर्मावलंबन…

चला तर मग..या निमीत्ताने आपण या सामुदायिक सोहळ्याकडे व्यापक नजरेने पाहूया….

 

राधिका भांडारकर पुणे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा