पु. ल. कला महोत्सव २०२३ मध्ये सांगीतीक संगम
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
शनिवारची संध्याकाळ. घराघरांत दिवाळीची लगबग असतांनाही रसिकांची श्रोत्यांची पावले आपोआपच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे थबकतात त्याचं कारणंही तितकंच खास असतं. अनघा मोडक यांचा गोड आवाज आणि त्यात आपलेपणाचा विश्वास त्यावर हंसध्वनी रागाच्या माध्यमातून पं. मिलिंद रायकर आणि सहकारी यांनी ‘व्हायोलिनचे रंग-तरंग’ या कार्यक्रमातून छेडलेला नादमय ताल.
पु. ल. कला महोत्सव २०२३ मध्ये शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५ वाजाता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी ‘व्हायोलिनचे रंग-तरंग’ या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय, तसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सूरांचे अनोखे सादरीकरण केले. व्हायोलिन सुरांची रांगोळी आकार घेत असतानाच दिग्गज ख्यातकीर्त ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त, प्रख्यात संगीत संयोजक अमर हळदीपूर, ज्येष्ठ अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक विजय गोखले, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेत्री-निर्मित्या अर्चना नेवरेकर, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजभोसले, उपाध्यक्ष विजय कोचिकर, सहकार्यवाह चैताली डोंगरे, निर्माती अमृता राव, इंडिअन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजनचे दिलीप दळवी, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेते श्रीरंग देशमुख, सिने दिग्दर्शक रामदास तांबे, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार, आयएएस अधिकारी निरूपमा डांगे, माजी सचिव श्री. जे. पी. डांगे, ओशिवारा लोखंडवाला सिटिझन्स फाऊंडेशनचे विश्वस्त आणि निर्माते कॅप्टन राकेश कोयलो, युवा संघटनेचे अध्यक्ष निर्माते शशिकांत शिर्सेकर, निर्माते हेमंत पुरोहित, दिग्दर्शक विनोद डावरे, निर्माता-दिग्दर्शक बबन जोशी, अभिनेत्री सिद्धी कामत, अभिनेत्री पल्लविका पाटील, अभिनेत्री नूतन जैन, अभिनेत्री सुनिता कांबळे, अभिनेत्री आकांक्षा जाधव, अभिनेत्री अदिती पाटील, अभिनेत्री मैथिली वारंग, अभिनेत्री पुजा जयस्वाल, निर्माते किरण कुडाळकर, अभिनेते समद खान, अभिनेता रंगराव भारगे आणि महाराष्ट्र बाजार पेठेचे संस्थापक संचालक डॉ. कौतिक दांडगे आदींनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शोभा वाढवली.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांची आणि मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीतबद्ध केलेल्या नाट्यपदांची तद्नंतर बॉलिवुड गाण्यांची मेडली रसिक श्रोत्यांची विशेष दाद घेऊन गेली. गोवन गीतानंतर कार्यक्रम सांगता मिले सुर मेरा तुम्हारा या गाण्यावर व्हायोलिनच्या तारा झंकारल्या.
तद्नंतर कलांगणाच्या प्रांगणातच संस्कार भारती, कोकण प्रांताच्या गुणवंत कलाकारांनी महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण ‘लोकरंग दिवाळी संध्या’ या कार्यक्रमातून केले. कार्यक्रमाचे निवेदन संतोष लिंबोरे पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात नमनाने झाली. तर कार्यक्रमाची सांगता लखलख चंदेरी ह्या गाण्यावर दिवे लावून झाली. गण, गवळण, दिंडी, कातकरी नृत्य, जोगवा त्याचप्रमाणे कोळीगीत, महाराष्ट्राची लावणी, जात्यावरच्या ओव्या, वासुदेव इ. महाराष्ट्राच्या मातीतून आलेले संस्कार संस्कृती तसेच महाराष्ट्राची अस्मिता जपणारी ही लोककला आपल्या गायन नृत्य आणि नाट्य प्रकारातून अप्रतिमरित्या सादर करण्यात आली.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका, मीनल जोगळेकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कलाकारांचे आणि रसिकांचे आभार व्यक्त करताना जोगळेकर म्हणाल्या, शहरात फटाक्यांची आतिषबाजी होत असताना इथे सुरांचे इंद्रधनुष्य साकरालं आणि हे इंद्रधनुष्य आकारास येत आपणही उत्तम साथ दिलीत, त्यासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. दोन्ही कार्यक्रमांसाठी श्रोतृवर्गाला आपल्या शब्दांमध्ये गुंतवून ठेवलं सूत्रसंचालन करणार्या निमिषा किरण वालावलकर यांनी. या दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पु. ल. महोत्सव २०२३ च्या समन्वयाची जबाबदारी राकेश तळगावकर आणि सहकारी शिताफीने पार पाडत आहेत. रविवारी कार्यक्रम नाहीत. पण सोमवारपासून अर्थात १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता अभिजात रंग यात्रा या संस्थेचा पु. ल. यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित “संग्रहापलीकडचे पु. ल.” हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता उत्स्फूर्त ठाणे या संस्थेचा अभिवाचन, नाट्य प्रवेश यासह दृकश्राव्यच्या माध्यमातून “स्त्री व्यक्तिरेखा… पुल यांच्या लेखनातल्या…” हा कार्यक्रम सादर होईल. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहेत.
*संवाद मिडिया*
💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨
मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩
👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!
🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,
🔹सॅम्पल सदनिका रेडी,
🔸गृह कर्जाची सुविधा,
🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!
🛑रेरा नं. P52900022211
फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟
🏚️New Max Developers🏘️
यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प
🌈”रेन्बो हिल्स”🏞️
🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-
👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख
👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख
👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख
👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!
मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖
🛑आमची वैशिष्ट्ये:-👇
♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️
♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️
♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️
♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴
♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢
🏡आमचा पत्ता:-
सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
📲संपर्क:-
9653693804 / 8104829770
*YouTube Link👇*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*