You are currently viewing माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टची कार्यकारणी जाहीर

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टची कार्यकारणी जाहीर

वैभववाडी

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेचे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यकारिणी जाहीर झाली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संशोधक, इतिहासतज्ञ श्री. प्रकाश भाऊ नारकर, उपाध्यक्ष गिर्यारोहक डॉ.कमलेश चव्हाण, सचिव प्रा. श्री. एस. एन. पाटील तर खजिनदार श्री.जगन्नाथ राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सहसचिव श्रीमती. दीप्ती मोरे, सदस्य म्हणून डॉ.संजीव लिंगवत व डॉ. गणेश मर्गज यांची निवड करण्यात आली आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही संस्था महाराष्ट्रातील गिर्यारोहणातील शिखर संस्था आहे. गिर्यारोहण क्रीडा प्रकाराच्या प्रसार व प्रचारासाठी ही संस्था कार्यरत आहे.गिर्यारोहण हा खेळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात परिणामकारकरीत्या पोहोचावा याकरीता शिखर संस्थेची व्याप्ती वाढवण्याचे अभियान हाती घेतले होते. या अंतर्गत जिल्हा पातळीवर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाची अधिकृत संलग्न “माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक” या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या कामी संस्थेचे अध्यक्ष श्री.उमेश झिरपे, कार्यायाध्यक्ष श्री. ऋषीकेश यादव व सचिव श्री.राजन बागवे यांचे बहूमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.संस्थेच्या माध्यमातून गिर्यारोहण क्षेत्राच्या कार्यशाळा, गिर्यारोहणाचे शिक्षण, प्रशिक्षण, शिबीर व सर्वांगीण विकास, प्रसार, प्रगती व वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. त्यासाठी आवश्यक सर्व कार्य करणे. सांस्कृतिक व नैसर्गिक इतिहास, गिर्यारोहण मोहिमा आणि ऐतिहासिक घटना या विषयांवर शास्त्रीय व शैक्षणिक स्वरूपाची माहिती व साहित्य संकलित करणे, जतन करणे, प्रदर्शन, साप्ताहिक, दैनिक, मासिक, त्रैमासिक व साहित्य छापणे व संबंधित सर्व कार्य करणे. या विषयावरील ज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे. दऱ्याखोऱ्यातील अविकसित गिरिप्रेमींच्या उन्नती व शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रात्यक्षिके व शिबिरे आयोजित करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची कार्यशाळा घेणे. गिरिप्रेमींसाठी व गिर्यारोहण संस्थांसाठी आवश्यक सामायिक व्यासपीठ निर्माण करणे. त्यांच्या सर्व समस्या सर्वतोपरी सोडविणे. गिर्यारोहण व संबंधित ऐतिहासिक वास्तू व पर्यावरणाचा समतोल राखण्याचे शिक्षण व प्रशिक्षण देणे, त्यासाठी सर्वतोपरी कार्य करणे. विविध गिर्यारोहण प्रेमींना गाव, खेडेगाव, तालुका, जिल्हा व राज्यातील सर्व स्तरांवर जाऊन शिक्षण, प्रशिक्षण, कार्यशाळा व त्यांना उत्तेजन व आधार देणे. गिर्यारोहणाबाबत त्यांना सर्वतोपरी मदत करणे. संस्थेंतर्गत जाणकार व तज्ञ गिर्यारोहकांचे व नवीन शिकाऊ गिर्यारोहकांचे दरम्यान चर्चासत्र, व्याख्यान, परिसंवाद, चित्रपट, लघुपट स्लाईड शो व इतर संबंधित कार्याचे आयोजन करणे. गिर्यारोहणावरील पुस्तकांचा व साहित्यांचा संग्रह करणे, त्यासाठी आवश्यक सर्व कार्य करणे. गिर्यारोहण संबंधी नियमावली, संकेत व इतर तंत्र तयार करणे, त्याची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने व्हावी म्हणून यंत्रणा उभारणे, उदा. गिर्यारोहणासंबंधी सुरक्षिततेचे नियम तयार करणे. गिर्यारोहणाबरोबरच इतर साहसी खेळांचा प्रचार, प्रसार, प्रगती व एकसूत्रीकरणासाठी प्रयत्न करणे. त्यांचे शिक्षण व प्रशिक्षण तसेच शिबिरे व कार्यशाळा आयोजित करणे. गिर्यारोहण व इतर साहसी खेळांच्या मोहीमा आयोजित करणे किंवा प्रायोजित करणे. गिर्यारोहण खेळाच्या सर्वांगीण विकास व वाढीकरिता आवश्‍यक असलेली प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, गिर्यारोहण शिखर संघटनांनी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाबाबत प्रयत्न करणे, स्पोर्ट्स क्लायबिंगच्या स्पर्धा आयोजित करणे, सर्व संबंधित साधनसामग्रीचा संच उभारणे. गिर्यारोहण व इतर साहसी खेळ, नैसर्गिक आपत्ती व सामाजिक अपघातांचे निवारण करण्याकरिता योजना आखणे व त्या कार्यान्वित करणे. तसेच पर्यावरण विषयक सर्व कार्य करणे. सर्व प्रकारचे पर्यावरण स्वच्छता कार्यक्रम सुरू करणे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी शिबिरे, चर्चासत्रे आयोजित करणे. पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे. पुरातन किल्ले, नदी, तळे, ओढे यांचे स्वच्छता व संवर्धन करणे, प्रत्यक्ष सहभाग घेणे, प्रशिक्षण देणे. पशुपालनाचे मार्गदर्शन करणे, त्यांचे संरक्षण करणे, वृक्षारोपण, नदी, जलाशय किल्ले स्वच्छ करणे, संवर्धन करणे. प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम सुरु करणे इत्यादी संस्थेची ध्येय-धोरणे ठरविलेली असून इतिहास,गिर्यारोहण व पर्यटन यांचा समन्वय साधत सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर व सचिव प्रा.एस.एन.पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
(कृपया संस्थेची कार्यकारिणी व ध्येयधोरण प्रसिद्ध करुन सहकार्य करावे.)

प्रतिक्रिया व्यक्त करा